भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आजपासून सुरू झाली आहे. पहिल्याच सामन्यात भारताकडून दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली आहे. हे असे खेळाडू आहेत ज्यांनी कसोटी आणि टी20 सामन्यांमध्ये आपले कौशल्य सिद्ध केले आहे. परंतु अद्याप एकदिवसीय सामन्यात संधी मिळालेली नाही. अचानक संघात समाविष्ट झालेल्या वरुण चक्रवर्तीला अजूनही त्याच्या एकदिवसीय पदार्पणाची वाट पहावी लागणार असली तरी यशस्वी जयस्वाल आणि हर्षित राणा यांचे नशीब आता उघडले आहे.
भारतीय संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना सुरू झाला तेव्हा त्याच्या सुमारे दहा मिनिटे आधी, दोन भारतीय खेळाडूंसाठी आनंदाची बातमी आली. यशस्वी जयस्वाल आणि हर्षित राणा यांना मैदानावर एकदिवसीय पदार्पणाची कॅप देण्यात आली. यावेळी संपूर्ण संघाने टाळ्या वाजवून या दोन्ही खेळाडूंचे स्वागत केले. यशस्वी जयस्वालला आज एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची शक्यता खूपच कमी होती, परंतु चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ही भारताची शेवटची एकदिवसीय मालिका आहे, म्हणूनच ती आणखी महत्त्वाची आहे.
नाणेफेकीदरम्यान प्लेइंग इलेव्हनची घोषणा करताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की विराट कोहली या सामन्यात टीम इंडियाचा भाग नाही. किंग कोहली न खेळण्याचे कारण सांगताना रोहित म्हणाला की काल रात्री त्याला गुडघ्याचा त्रास झाला होता. ज्यामुळे तो सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. आता सामन्यात विराट कोहलीच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळतो हे पाहणे मनोरंजक असेल.
इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन: बेन डकेट, फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.
भारताचा प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.
हेही वाचा-
अत्यंत वेदनादायी…द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन, क्रिकेटविश्वातील शब्दसूर्य मावळला..!
‘हे’ दिग्गज खेळाडू असणार मुंबईचा भाग, रणजी ट्रॉफीमध्ये हरियाणाविरुद्ध उतरणार मैदानात
दु:खद बातमी.! लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे 74 व्या वर्षी निधन






