पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघातील वनडे मालिकेचा तिसरा सामना रविवारी झाला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. भारतीय संघाने याचा फायदा घेत ४८.२ षटकात ३२९ धावांचा डोंगर उभा करत इंग्लंडला ३३० धावांचे आव्हान दिले आहे. भारताच्या या डावात एक गमतीशीर घटनाही पाहायला मिळाली. शार्दुल ठाकूरने षटकार मारल्यानंतर बेन स्टोक्सने त्याची बॅट तपासली होती.
झाले असे की, शार्दुल ८ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्याने फलंदाजीला आल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला. तो आक्रमकपणे फलंदाजी करत असताना डावातील ४५ वे षटक टाकण्यासाठी बेन स्टोक्स आला. त्याने या षटकातील चौथा चेंड ऑफसाईड ऑफला टाकला. त्यावर शार्दुलने लाँग ऑफच्या दिशेने जोरदार फटका मारला. हा फटका इतका शानदार होता की चेंडू थेट बाऊंड्री बाहेर गेल्याने षटकार मिळाला.
या षटकारानंतर स्टोक्सने गमतीने शार्दुलकडे येत त्याची बॅट गमतीने तपासली. त्यावेळी शार्दुल आणि स्टोक्स दोघेही एकमेकांकडे पाहून हसतानाही दिसले.
स्टोक्स आणि शार्दुल हे दोघेही आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघाकडून एकत्र खेळले आहेत. त्यामुळे त्यांच्यात मैत्री आहे.
https://twitter.com/AyushAn99270824/status/1376134296310673413
https://twitter.com/Boiesji45/status/1376134679934291970
https://twitter.com/cric_neaz/status/1376136405965959175
भारतीय संघ सर्वबाद
या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आल्यानंतर भारताच्या शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. त्यांनी १०३ धावांची सलामी दिली. मात्र, शिखर ६७ धावांवर आणि रोहित ३७ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली ७ धावा करुन, तर केएल राहुल देखील ७ धावा करुन माघारी परतले. त्यामुळे भारताची अवस्था ४ बाद १५७ धावा अशी असतानाच रिषभ पंत आणि हार्दिक पंड्याने आक्रमक फलंदाजी करत भारताचा डाव सावरला.
पंत आणि हार्दिकमध्ये ५ व्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी पंत बाद झाल्याने तुटली. पंतने भारताकडून या डावात सर्वाधिक ७८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ६२ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार आणि ४ षटकार मारले. तसेच हार्दिक ४४ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकार मारुन ६४ धावांवर बाद झाला.
यानंतर भारतीय फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या, पण त्यावेळी त्यांनी आक्रमक फटकेबाजीही केली. कृणाल पंड्याने २५ धावा केल्या. तर शार्दुल ठाकूरने ३ षटकारांसह ३० धावा केल्या. भुवनेश्वर कुमार ३ धावांवर आणि प्रसिद्ध कृष्णा शुन्यावर बाद झाला. त्यामुळे भारताचा डाव ४८.२ षटकात ३२९ धावांवर संपुष्टात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
व्वा! खुद्द पंतप्रधान मोदींनी घेतली मिताली राजच्या कामगिरीची दखल, केलं तोंडभरुन कौतुक
नादच खुळा! इंग्लिश गोलंदाजाच्या चेंडूवर रिषभचा एका हाताने सिक्सर, पाहा झक्कास व्हिडिओ






