रविंद्र जडेजा पुन्हा एकदा भारतीय संघासाठी गरजेच्या वेळी महत्वपूर्ण प्रदर्शन करताना दिसला. गुरुवारी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये सुरू झाला. उभय संघातील ही कसोटी मालिका तीन सामन्यांची असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक विजय मिळवला. राजकोट कसोटीच्या पहिल्याच दिवशी कर्णधार रोहित शर्मा याच्यानंतर रविंद्र जडेजा यानेही शतक साकारले.
उभय संघातील या सामन्याची नाणेफेक भारताने जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात संघाची धावसंख्या अवघी 33 अशताना भारताचे तीन महत्वाचे फलंदाज तंबूत परतले. पण पहिल्या डावातील चौथ्या विकेटसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी द्विशतकी भागीदारी केली. या दोघांनी 329 चेंडूत 204 धावांचे योगदान भारतीय संघासाठी दिले. रोहित शर्मा याने महत्वाच्या वेळी कर्णधार म्हणून आपली जबाबदारी चोख पार पाडली. 196 चेंडूत 131 धावा करून रोहित शर्मा बाद झाला. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील 11वे शतक होते. सोबतच रोहित कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी शतक करणारा सर्वात वयस्कर (36 वर्ष 291 दिवस) कर्णधार बनला.
दुसरीकडे रविंद्र जडेजा यानेही रोहित बाद झाल्यानंतर आपले शतक पूर्ण केले. जडेजासाठी हे कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक असून यासाठी अष्टपैलूने 198 चेंडू खेळले. यादरम्यान जडेजाचा स्ट्राईक रेट 50.5 इतका होता.
(IND vs ENG 3rd Test Ravindra Jadeja, came in when India were 33/3 and now scored a marvelous century)
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन – बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.
महत्वाच्या बातम्या –
IND Vs ENG : तिसऱ्या कसोटीत सरफराज खानच्या वडीलांच्या ‘जॅकेट’ची सर्वत्र चर्चा, दिला जगाला खास संदेश
राजकोटमध्ये हिटमॅनचे राज! जबाबदारी घेत ठोकले कारकिर्दीतील 11 वे कसोटी शतक; भारत 200 पार