---Advertisement---

INDvENG : निर्णायक ५ व्या टी२० सामन्यात रोहित, केएल राहुलसह ‘हे’ क्रिकेटपटू करु शकतात मोठे विक्रम

On: शनिवार, मार्च 20, 2021 3:47 PM
---Advertisement---

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात शनिवारी (२० मार्च) ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पाचवा सामना नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे. तसेच या मालिकेत सध्या २-२ अशी बरोबरी झालेली आहे. त्यामुळे ५ वा सामना निर्णायक सामना असणार आहे.

तसेच या सामन्यात भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंना काही विक्रम करण्याची संधी आहे. या विक्रमांबद्दल या लेखातून जाणून घेऊ.

भारत विरुद्ध इंग्लंड संघात होणाऱ्या ५ व्या टी२० सामन्यात होऊ शकतात हे विक्रम 

१. रोहित शर्माने या सामन्यात ४० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तोआंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. सध्या तो या यादीत विराट कोहली (३०७९) आणि मार्टिन गप्टील (२८३९) यांच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या त्याच्या नावावर ११० आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २८०० धावा आहेत.

२. केएल राहुलने जर या सामन्यात ५९ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो सुरेश रैनाला मागे टाकत भारताकडून टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा ५ व्या क्रमांकाचा फलंदाज ठरेल. त्याने सध्या ४९ सामन्यात १५५७ धावा केल्या आहेत.

३. केएल राहुलला जर या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली तर हा त्याचा ५० वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना असेल. ५० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणारा तो भारताचा ९ वा क्रिकेटपटू ठरेल.

४. जर इंग्लंडने हा सामना जिंकला तर ओएन मॉर्गन पहिला इंग्लंडचा कर्णधार ठरेल जो भारताविरुद्ध द्विपक्षीय टी२० मालिका जिंकेल.

५. ओएन मॉर्गनने या सामन्यात ३९ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरु शकतो. सध्या तो या यादीत १३८३ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यापुढे ऍरॉन फिंच (१४६२) आणि केन विलियम्सन (१३८३) आहेत.

६. डेविड मलानने या सामन्यात ६५ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा क्रिकेटपटू ठरेल. त्याच्या नावावर सध्या २३ आंतरराष्ट्रीय टी२० डावात ९३५ धावा आहेत. तसेच सध्या आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वात जलद १००० धावा करण्याचा विक्रम बाबर आझमच्या नावावर आहे. आझमने २६ डावात १००० धावा पूर्ण केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

सीएसकेच्या कॅम्पमध्ये ‘वाथी कमिंग’ची हवा, ऋतुराजसह ‘यांनी’ धरला ताल; पाहा झक्कास व्हिडिओ

“मिस्बाह-उल-हक म्हणजे गरिबांचा एमएस धोनी,” पाकिस्तानी दिग्गजाचं मोठं भाष्य

हे म्हणजे आपल्याकडे ठाकूर आहे पण शोलेवाला, असं झालं! ‘त्या’ निर्णयावरुन भारतीय दिग्गजाच्या पंचांना कानपिचक्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---