जेम्स अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज आहे. शनिवारी (9 मार्च) त्याच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 700 विकेट्स घेणारा अँडरसन केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे. धरमशाला कसोटीत शनिवारच्या पहिल्या सत्रात त्याने कुलदीप यादव याला यष्टीरक्षक बेन फोक्सच्या हातात बाद केले आणि मोठा विक्रम नावावर केला.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत जेम्स अँडरसन (James Anderson) तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण 700 कसोटी विकेट्स हा नक्कीच क्रिकेटच्या इतिहासातील महाविक्रम म्हणता येईल. याआदी केवळ दोन गोलंदाज ही कामगिरी करू शकले. श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकीपटू मुथैया मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याने कसोटी क्रिकेटमध्ये 800 विकेट्स नावावर केल्या. यादीत दुसरा क्रमांक ऑस्ट्रेलिया महान फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) याचा आहे. वॉर्नने आपल्या कारकिर्दीत एकूण 708 कसोटी विकेट्स घेतल्या.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
मुथय्या मुरलीधरन – 800.
शेन वॉर्न – 708.
जेम्स अँडरसन – 700*.
अनिल कुंबळे – 619.
उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने अवघ्या 218 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात भारतासाठी रोहित शर्मा (103) आणि शुबमन गिल (110) यांनी शतकी खेळी केली. त्याचसोबत यशस्वी जयस्वाल, सरफराज खान आणि देवदत्त पडिक्कल यांनी अर्धशतके ठोकली. परिणामी भारताने आपल्या पहिल्या डावात 477 धावांपर्यंत मजल मारली आणि 259 धावांची आघाडी मिळवली. इंग्लंडसाठी पहिल्या डावात सलामीवीर झॅक क्रॉली याने 79 धावांची सर्वोत्तम खेळी केली. तर गोलंदाजी विभागात शोएब बशीर याने विकेट्सचे पंचक नावावर केले. (700 Test Wickets for James Anderson and First Pacer to do so)
धरमशाला कसोटीसाठी दोन्ही संघ –
भारताची प्लेइंग इलेव्हन – यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल (पदार्पण), रविंद्र जडेजा, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.
महत्वाच्या बातम्या –
विराट-युवराजला संपूर्ण कारकिर्दीत जितके षटकार मारता आले नाहीत, तितके यशस्वीनं केवळ 9 कसोटीत मारले!
IPL 2024 साठी धोनीचा विंटेज लूक, लांब केसांसह फोटो सोशल मीडियावर व्हायरल