धरमशाला कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ 477 धावांवर सर्वबाद झाला. शनिवारी (9 मार्च) पहिल्याच सत्रात इंग्लंडचा दुसरा डाव सुरू झाला. पहिल्या डावात भारताने 259 धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताचे सर्व खेळाडू श्रेत्ररक्षणासाठी मैदानात आले. पण एकटा रोहित शर्मा मैदानात दिसला नाही.
भारताने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. इंग्लंड संघ पहिल्या डावात अवघ्या 218 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या डावात 477 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 103, तर शुबमन गिल याने 110 धावांची सर्वोत्तम खेळी केली. यशस्वी जयस्वाल, सरफराज खान आणि देवदत्ता पडिक्कल यांनीही अर्धशतके ठोकली.
शनिवारी पहिल्या सत्रात धरमशाला कसोटीचा पहिला डाव संपला. भारतीय संघाने 259 धावांची आघाडी मिळवली. यजमान संघ दुसऱ्यांदा गोलंदाजीला आला, तेव्हा कर्णधार रोहित शर्मा नेतृत्व करत असणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात कर्णधारपदाची जबाबदारी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सांभाळात होता. पाठिच्या दुखापतीमुळे रोहित इंग्लंडच्या दुसऱ्या डावात क्षेत्ररश्रण करत नाहीये. बीसीसीआयच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही पोस्ट केली गेली आहे.
UPDATE: Captain Rohit Sharma has not taken the field on Day 3 due to a stiff back.#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) March 9, 2024
(Captain Rohit Sharma is not in the field on Day 3 due to a stiff back)
धरमशाला कसोटीसाठी दोन्ही संघ –
भारताची प्लेइंग इलेव्हन – यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल (पदार्पण), रविंद्र जडेजा, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.
महत्वाच्या बातम्या –
“ही कामगिरी अद्भुत!”, क्रिकेटच्या देवानंही केलं 700 बळी घेणाऱ्या जेम्स अँडरसनचं कौतुक
ऐतिहासिक! भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत ‘हा’ 147 वर्षे जुना विक्रम उद्ध्वस्त