भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडला 247 धावांवर बाद करून भारताने सामन्यात उत्साहाची भर घातली आहे. तथापि, दुसऱ्या दिवशीही पावसाचा परिणाम झाला आणि सामना अनेक वेळा थांबवण्यात आला. अशा परिस्थितीत, तिसऱ्या दिवशी सत्राच्या वेळेत आणि षटकांच्या संख्येत थोडासा बदल करण्यात आला आहे. क्रिकबझच्या मते, तिसऱ्या दिवशी एकूण 98 षटके खेळवली जातील आणि सामना भारतीय वेळेनुसार रात्री 11.30 पर्यंत चालेल. सहसा दिवसाचा खेळ रात्री 10.30 वाजता संपतो, जर षटके पूर्ण झाली नाहीत तर सामना 11 वाजेपर्यंत वाढवला जातो.
तिसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल आणि पहिले सत्र संध्याकाळी 5.30 पर्यंत चालेल. जेवणाची सुट्टी देखील 40 मिनिटांची असेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्राच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. दोन्ही सत्रांमध्ये प्रत्येकी 15 मिनिटांनी वाढ करण्यात आली आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड पाचव्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या सत्राची वेळ- (भारतीय वेळेनुसार)
पहिले सत्र: दुपारी 3.30-5.30
दुपारी जेवण: दुपारी 5.30-6.10
दुसरे सत्र: दुपारी 6.10-8.25
चहा ब्रेक: रात्री 8.25-8.45
तिसरे सत्र: रात्री 8.25-11
तिसऱ्या दिवशी एकूण 98 षटके खेळवली जातील, जर रात्री 11 वाजेपर्यंत 98 षटके पूर्ण झाली नाहीत तर दिवसाचा खेळ 30 मिनिटांनी वाढवला जाईल.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारताने त्यांच्या दुसऱ्या डावात 2 विकेट गमावून 75 धावा केल्या आहेत. दुसऱ्या डावात भारताचा इकाॅनमी आतापर्यंत 4.17 आहे, याचे मुख्य कारण म्हणजे यशस्वी जयस्वाल जो 49 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 51 धावांवर फलंदाजी करत आहे. आकाशदीप दिवसाच्या खेळाच्या शेवटपर्यंत त्याच्यासोबत क्रीजवर आहे. केएल राहुल आणि साई सुदर्शनच्या रूपात भारताला दोन धक्के बसले.
तत्पूर्वी, इंग्लंडचा पहिला डाव 247 धावांवर संपला आणि भारताच्या (224) पहिल्या डावाच्या आधारे यजमानांनी 23 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडकडून जॅक क्रॉली आणि हॅरी ब्रूकने अर्धशतके झळकावली. तर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने भारताकडून 4-4 बळी घेतले.






