भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. पाहुण्या इंग्लंडने या सामन्यात 28 धावांनी भारताला मात दिली. पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यावर मोठ्या प्रामाणात टीका देखील झाल्या. पण आता भारताच्या एका माजी दिग्गजाने पराभवानंतरही रोहित शर्माचे कौतुक केले आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) मागच्या दोन वर्षांपासून भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात मागच्या वर्षी आयसीसी वनडे विश्वचषकात भारतीय संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. दरम्यानच्या काळात रोहितने भारताला अनेक महत्वाच्या मालिका आणि सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. त्याचे नेतृत्वगुण मागच्या दोन वर्षात प्रामुख्याने सर्वांना दिसून आले आहेतच. पण वैयक्तिक प्रदर्शनातही रोहित स्वतःला सिद्ध करू शकला. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी सलामीवीर फलंदाज आणि सध्या समालोचनाचे काम करणारा आकाश चोप्रा व्यक्त झाला आहे.
आकाश चोप्राच्या मते रोहित शर्मा असा खेळाडू आहे, जो एकट्याच्या जोरावर सामन्याचा निकाल बदलू शकतो. तो लयीत असेल आणि मोठी खेळी केली, तर त्याच्या संघाला पराभूत करणे कठीण असते. आकाश चोप्रा म्हणाला, “रोहित शर्मा एक असा सलामीवीर फलंदाज आहे, जो कसोटी क्रिकेटमध्ये खेळला, तर सामना अशा ठिकाणी नेतो, जेथून सामन्यात पराभव होत नाही.”
दरम्यान, चाहत्यांप्रामाणे आकाश चोप्रा यालाही रोहितवर विश्वास आहे. पण पहिल्या सामन्यात भारताच्या पराभवानंतर नक्कीच त्याच्यापर प्रश्न उपस्थित झाले. हैदराबाद कसोटीच्या शेवटच्या डावात भारताला 231 धावा हव्या होत्या. पण भारतीय संघ 69.2 षटकांमध्ये 202 धावा करून सर्वबाद झाला. (IND vs ENG Akash Chopra praises Rohit Sharma)
महत्वाच्या बातम्या –
विराटच्या कमबॅकपर्यंत उशीर होईल! विशाखापट्टणम कसोटीआधी माजी दिग्गज असं का म्हणाला?
IND vs ENG । दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची रणनीती ठरली; मॅक्युलम म्हणतोय, ‘घाबरत नाही…’