इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात आकाश दीप याने पदार्पण केलं आहे. तसेच आकाश दीपने आपल्या पदार्पणात धमाका उडवला आहे. आकाशने टीम इंडियासाठी 3 विकेट्स घेत इंग्लंडला बॅकफुटवर ढकललं होतं. मात्र आकाशने आधी झॅक क्रॉली याला क्लिन बोल्ड केलं मात्र तो दुर्देवी ठरला. नो बॉल असल्याने झॅक क्रॉली याला जीवनदान मिळालं. मात्र त्यानंतर आकाश दीप याने न खचता जोरदार कमबॅक केलं आणि 3 विकेट्स घेतल्या आहेत.
याबरोबरच, भारताकडून कसोटी पदार्पण करणारा आकाश दीप 313 वा भारतीय खेळाडू ठरला आहे. पदार्पणाच्या सामन्यातही त्याने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. इंग्लंडविरुद्ध प्राणघातक गोलंदाजी करताना त्याने आतापर्यंत बेन डकेट, ऑली पोप आणि जॅक क्रॉलीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. मात्र, आकाश दीपने डावाच्या चौथ्या षटकात जॅक क्रॉलीला बोल्ड केले होते. पण नंतर तपासणी केली असता तो नो बॉल होता. यानंतर चाहते सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आकाश दीपच्या नो बॉलनंतर काही चाहत्यांना जसप्रीत बुमराहची आठवण येऊ लागली आहे. याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
WHAT A BALL….???? But it's a no-ball.
– Feel for Akash Deep on his debut. pic.twitter.com/1zeC3YkY3j
— Johns. (@CricCrazyJohns) February 23, 2024
पहिल्या दिवसाच्या खेळात आकाश दीपने इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. पण आकाश दीपने नो बॉलवर विकेट घेतल्यानंतर चाहते सोशल मीडियावर मीम्स शेअर करत आहेत. एका चाहत्याने मीम शेअर केला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती मास्क घातली आहे. कर्णधार रोहित शर्मा त्याच्या जवळ उभा असलेला दिसतो आणि म्हणतो, ‘मला बघू दे कोण नो बॉलवर विकेट घेतंय.’ त्यानंतर ते सगळे त्या व्यक्तीच्या डोक्यावरून पडदा उचलतात आणि म्हणतात, ‘अरे, बुमराह आहे.’
Wicket on No Ball : Akash Deep ???? Bumrah pic.twitter.com/SXJPt0pnR5
— ???????????????????????????????? (@sarcasqo) February 23, 2024
दरम्यान, आकाश दीपने नो बॉलवर विकेट घेतल्यानंतर चाहत्यांना जसप्रीत बुमराहची आठवण येत आहे. खरं तर, 2017 मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या ICC चॅम्पियन ट्रॉफी दरम्यान जसप्रीत बुमराहने नो बॉल टाकला होता, त्यानंतर ज्या फलंदाजाने त्याने विकेट घेतली होती त्याने शतक केले होते. त्यामुळे भारताला हा सामना गमवावा लागला होता. त्यामुळे नो बॉलवर विकेट घेतल्यावर चाहत्यांना जसप्रीत बुमराहची आठवण येत आहे.
महत्वाच्या बातम्या –






