भारतीय क्रिकेट संघाचा स्ट्रार स्पिनर रविचंद्रन अश्विन काही दिवासंपूर्वी कोरोना संक्रमित आढळला होता. आता तो कोरोनातून पूर्णपणे सावरला आहे आणि भारतीय संघासाठी लिसेस्टरशायरविरुद्ध चार दिवसांचा सराव सामना खेळत आहे. अश्विन भारतीय ताफ्यात सहभागी झाल्यामुळे संघातील इतर खेळाडूंना काहीसा दिलासा मिळाला आहे. इंग्लंडिवरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकमात्र कसोटी सामन्यात अश्विनची भूमिका महत्वाची असेल.
भारतीय संघ काही दिवसांपूर्वी इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाला होता, तेव्हा रविचंत्रन अश्विन (Ravichandran Ashwin) त्यांच्यासोबत नव्हता. तेव्हा तो कोरोना संक्रमित असल्यामुळे विलगिकरणात देखील होता. त्याने स्वतःचा विलगिकरण कालावधी पूर्ण केला आणि नंतर इंग्लंडसाठी रवाना झाला. अश्विनची इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या कसोटी सामन्यातील आकडेवारी पाहिली, तर ती अतिशय उत्कृष्ट राहिली आहे.
रविचंद्रन अश्विन आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध एकूण १९ कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये त्याने २८५९ च्या सरासरीने ८८ विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध खेळताना त्याने ६ वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. तर एकदा १० विकेट्स घेतल्या आहेत. त्याची ही आकडेवारी पाहता अश्विन इंग्लंडविरुद्ध १ जुलैपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात देखील महत्वाची भूमिका बजावू शकतो, यात शंका नाही.
अश्विन कोरोनातून बाहेर पडला ही संघासाठी चांगली बातमी आहे. पण भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला मात्र कोरोनाची लागण झाली आहे. रोहित सथ्या सुरू असेलल्या लिसेस्टरशायर संघाविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळत होता, पण अचानक त्याला कोरोना संक्रमण झाल्याची बातमी समोर आली. याच कारणास्तव त्याला सराव सामन्यातून बाहेर व्हावे लागले. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात देखील आता रोहितला सहभागी होता येणार नाही.
दरम्यान, १ जुलैपासून खेळला जाणारा कसोटी सामना हा, मागच्या वर्षीच्या कसोटी मालिकेतील राहिलेला आहे. मागच्या वर्षी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी आला होता. परंतु संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना रद्द केला गेला होता. हाच सामना यावर्षी पुन्हा आयोजित केला गेला आहे. भारताला यावर्षीच्या इंग्लंड दौऱ्यात कसोटी सामन्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
उमरान मलिकची पदार्पणाची प्रतिक्षा संपणार? कर्णधार हार्दिक पांड्याने दिले संकेत
‘मी सांगतोय ना, उमरानला टी२० विश्वचषकात घ्या’, भारताच्या माजी कर्णधाराचे विधान