IND Vs ENG : भारतीय संंघाने इंग्लंड संघाचा पाचव्या कसोटी सामन्यामध्ये एक डाव आणि 64 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यामधील विजय हा ऐतिहासिक ठरला आहे. तसेच इग्लंड संघाने पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभूत करत कडक सुरूवात केली होती. मात्र भारतीय संघाने चारही सामन्यात मुसंडी मारत इंग्लंड संघाला चारीमुंड्या चीत केलं. भारतीय संघाच्या विजयानंतर बीसीसीआयनेही यावर खेळाडूंना बक्षीस दिले आहे.
बीसीसीसआयचे सचिव जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. आता कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडणार आहे. तसेच कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंना आता सामन्याच्या मानधनाशिवाय आणखी पैसे मिळणार आहेत. जय शाह यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कसोटी क्रिकेटकडे खेळाडू आता कानाडोळा करू लागल्याने बीसीसीआयनेही अशा प्रकारे डोकं लावलं आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्याचे प्रत्येक खेळाडूला 15 लाख इतकं मानधन मिळतं. पण आता है पैसे तर मिळणारच आहेत. पण बोनसप्रमाणे आणखी काही एक ठराविर रक्कम खेळाडूंना मिळणार आहे. नेमके किती पैसे आणि कोणत्या खेळाडूंना मिळणार जाणून घ्या सविस्तर. एका खेळाडूने एका सीझनमध्ये 75 टक्के (7 किंवा त्याहून अधिक) कसोटी सामने खेळले तर त्याला प्रत्येक सामन्याचे 45 लाख रुपये मिळणार आहेत.
50 टक्के म्हणजे (5 किंवा 6 अधिक) कसोटी खेळणाऱ्यांना प्रति सामना 30 लाख रुपये आणि जे खेळाडू प्लेइंग 11 चा भाग नसतीला त्यांना 15 कोटी एका सामन्याचे मिळणार आहेत. जर एखाद्या खेळाडूने एकी सीझनमध्ये 9 कसोटी सामने असतील त्यातील चारही सामने खेळले नसतील तर त्यांना कोणतंही जास्तीचं मानधन मिळणार आहे.
I am pleased to announce the initiation of the 'Test Cricket Incentive Scheme' for Senior Men, a step aimed at providing financial growth and stability to our esteemed athletes. Commencing from the 2022-23 season, the 'Test Cricket Incentive Scheme' will serve as an additional… pic.twitter.com/Rf86sAnmuk
— Jay Shah (@JayShah) March 9, 2024
दरम्यान, कसोटी क्रिकेटमधील वार्षिक केंद्रीय करारामधून दोन खेळाडूंना बाहेर ठेवण्यात आलं. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर अशी दोन्ही खेळाडूंची नावे आहेत. बीसीसीआयने दणका दिल्यावर अय्यर रणजीमध्ये मुंबईकडून खेळण्यासाठी तयार झाला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- WPL 2024 : ‘करो या मरो’ सामन्यात गुजरात जायंट्सने टॉस जिंकूण घेतला फलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग 11
- आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने घेतली हॅट्रिक, अन् लसिथ मलिंगाच्या खास क्लबमध्ये झाला सामिल