टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाशी इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने भारताविरुद्ध मोठा पराक्रम केला आहे. तसेच डकेटचे कसोटी कारकीर्दीतील हे तिसरं शतक ठरलं आहे. यामध्ये डकेटने चौकार ठोकत बेझबॉल पद्धतीने शतक झळकावलं आहे. तसेच डकेटने या 88 चेंडूच्या मदतीने शतक पूर्ण केलं. तसेच डकेटने हे तिसरं शतक 115.91 च्या स्ट्राईक रेटने लगावलं. डकेटच्या या खेळीत 19 चौकार आणि 1 सिक्सचा समावेश होता. डकेटने या शतकासह मोठा विक्रमही केला आहे.
आपल्याच संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसनला मागे टाकले आहे. तर बेन डकेटच्या आधी भारतात एकाही फलंदाजाला इतक्या कमी चेंडूत एका डावात 150 धावा करता आल्या नाहीत. तसेच डकेट भारताविरुद्ध 153 धावांची शानदार फलंदाजी केली आहे. याखेळीत त्याने केविन पीटरसन, पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक आणि त्याच्या संघाच्या साची ओली यांना मागे टाकले आहे.
याबरोबरच सन 2000 नंतर, बकेटने भारतात 139 डावात 150 धावा केल्या होत्या तर केविन पीटरसनने 209 चेंडूत 150 धावा केल्या होत्या. तसेच या मालिकेतील पहिल्या सामन्यात पोपने दुसऱ्या डावात धावा केल्या होत्या. तर 2010 मध्ये, बॅटन नेकलनने हैदराबादमध्ये 218 डावात 150 धावा करून न्यूझीलंडसाठी चांगली खेळी केली होती.
दरम्यान, टीम इंडियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा आणि लोकल बॉय रवींद्र जडेजा या दोघांनी शतकी खेळी केली. तर डेब्यूटंट सरफराज खान आणि ध्रुव जुरेल या दोघांनी चमकदार कामगिरी केली. रोहित आणि रवींद्र जडेजा याने दोघांनी अनुक्रमे 131 आणि 112 धावा केल्या. तर सरफराज खान 62 आणि ध्रुव जुरेलने 46 धावांचं योगदान दिलं होतं.
महत्वाच्या बातम्या –
- न्यूझीलंडला मोठा झटका! दिग्गज खेळाडू एका वर्षांसाठी संघातून बाहेर, जाणून घ्या कारण
- मोहम्मद हाफीजची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला धमकी, म्हणाला ‘मी सर्वांना उघडे पाडेन…