भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियामधील रिषभ पंतसोबतच्या फलंदाजीचा अनुभव सांगितला आहे. 2020-21 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी दरम्यान भारताला 406 धावांचे लक्ष्य मिळाले होते आणि पंतने त्या सामन्यात 97 धावांची खेळी खेळली होती. मात्र, तो आपले शतक पूर्ण करण्यात चुकला. पण त्याने पुजारासह चौथ्या डावात 148 धावांची भागीदारी केली होती.
भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिली कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिली तर दुसरी कसोटी गुरुवारी (12 ऑगस्ट) पासून लॉर्ड्स येथे खेळली जाईल.
बीबीसी टेस्ट मॅच स्पेशल प्रोग्राममध्ये संभाषणादरम्यान पुजारा म्हणाला की, “मला खरोखरच वाटले नव्हते की, पंत त्या दिवशी इतक्या वेगाने धावा करू शकेल. मला त्याला काही सांगण्याची गरजही नव्हती. त्याच्या नैसर्गिक खेळामुळे तो चेंडू सहज मैदानाबाहेर काढत होता. मी त्याच्याशी फक्त एकदाच बोललो. त्यावेळी तो 90 धावांच्या आसपास खेळत होता. मी त्याला सांगितले की, तुला थोडे अधिक काळजीपूर्वक खेळण्याची गरज आहे, पण नंतर तो बाद झाला.”
पंतने नंतर गॅबा येथे चौथ्या कसोटीत नाबाद 89 धावा केल्या. ज्यामुळे भारताने शेवटच्या दिवशी 389 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मालिका 2-1 ने जिंकली. पुजारा म्हणाला की, “पंतला माहित होते की, त्याच्याकडे पर्याय नाही, विशेषत: शुभमन गिलने संघाला एक चांगली सुरुवात दिली होते.”
तो म्हणाला, “शेवटची परिक्षा गॅबा येथे होती. मला वाटते ती चांगली खेळपट्टी होती. यावर आपण किमान सामना काढू शकतो. दुपारच्या जेवणानंतर शुभमन गिलने ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्यामुळे आम्हाला खूप आत्मविश्वास मिळाला. दुसऱ्या सेशेनमध्ये मी देखील भरपूर फटके मारण्यास सुरुवात केली. जेव्हा रिषभ फलंदाजीसाठी आला तेव्हा आम्हाला माहित होते की, तो फॉर्ममध्ये आहे. त्याला त्याचा खेळ माहित आहे. त्याला माहित होते की, तो ड्रॉ साठी खेळत नाही. तो जिंकण्यासाठी खेळायला गेला आहे.’
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये, ‘हे’ ४ महारथी ठरु शकतात मॅचविनर
लॉर्ड्स कसोटीसाठी विराट सेना सज्ज! बीसीसीआयने शेअर केली छायाचित्रे






