भारत- इंग्लंड यांच्यामध्ये सात ते अकरा मार्चदरम्यान धरमशाला येथे पाचवी कसोटी खेळवण्यात येणार आहे. या कसोटीत बुमरा खेळणार आहे. मात्र के. एल. राहुल अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नसल्यामुळे पाचव्या कसोटीत त्याच्या खेळण्याची शक्यता कमीच आहे. याबरोबरच आयपीएल, टी-२० विश्वकरंडक, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका अशा महत्त्वाच्या स्पर्धा आगामी काळात असल्यामुळे राहुलने पूर्ण तंदुरुस्त होण्याची गरज आहे.
याबरोबरच, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ७ ते ११ मार्चला धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तसेच भारताने कसोटी मालिका आधीच जिंकली आहे, त्यामुळे संघ व्यवस्थापन पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात देवदत्त पडिक्कल भारतीय कसोटी संघात स्थान भेटण्याची जास्त शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अशातच देवदत्त पडिक्कलही फॉर्मात असून 23 वर्षीय देवदत्त पडिक्कलने 31 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 44.54 च्या उत्कृष्ट सरासरीने 2227 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 6 शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. देवदत्त पडिक्कलची प्रथम श्रेणी सामन्यातील सर्वोत्तम धावसंख्या १९३ धावा आहे. तसेच देवदत्त पडिक्कलने 30 लिस्ट ए सामन्यांमध्ये 81.52 च्या उत्कृष्ट सरासरीने 1875 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 8 शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. देवदत्त पडिक्कलचा लिस्ट ए सामन्यातील सर्वोत्तम धावसंख्या 152 धावा आहे.
देवदत्त पडिक्कलने त्याच्या शेवटच्या 10 प्रथम श्रेणी डावांमध्ये 30, 193, 42, 31, 103, 105, 65, 21, 151 आणि 36 धावा केल्या आहेत. या काळात देवदत्त पडिक्कलची फलंदाजीची सरासरी 77.7 आहे. देवदत्त पडिक्कलने त्याच्या शेवटच्या 10 प्रथम श्रेणी डावांमध्ये 4 शतके झळकावली आहेत, ज्यामध्ये 151 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. फॉर्म पाहता देवदत्त पडिक्कलला धर्मशालामध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. देवदत्त पडिक्कलला धर्मशाला कसोटीत चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू शकते. याचा अर्थ रजत पाटीदारला प्लेइंग 11 मधून बाहेर बसावे लागू शकते.
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सहा डावांमध्ये रजत पाटीदारने एकदाही 40 धावांचा टप्पा ओलांडलेला नसून त्याने या मालिकेतील 3 कसोटी सामन्यांच्या 6 डावात 32, 9, 5, 0, 17, 0 धावा केल्या आहेत. रजत पाटीदारने 3 कसोटी सामन्यांच्या 6 डावात एकूण 63 धावा केल्या आहेत. रजत पाटीदार मोठ्या संधींचा फायदा उठवण्यात अपयशी ठरत असल्याने कसोटी संघातील त्याच्या स्थानावर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात रजत पाटीदारलाही प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या –
- बीसीसीआयने अखेर ईशान किशन-श्रेयस अय्यरची जिरवली मस्ती, अखेर ज्याची शक्यता होती तेच झालं
- IND vs ENG : जेम्स अँडरसन या दिग्गज भारतीय गोलंदाजाला मानतो गुरू; म्हणाला, ‘रिव्हर्स स्विंगची कला…