भारताने चौथ्या कसोटीत इंग्लंडचा 5 विकेट्सनी पराभव करत मालिकेत 3 -1 अशी आघाडी घेतली. तसेच भारताचा हा मायदेशातला सलग 17 वा कसोटी मालिका विजय आहे. चौथ्या कसोटीत आर. अश्विन, आकाश दीप, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी दमदार कामगिरी केली. तर इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने 307 धावा केल्या. दुसऱ्या डावात इंग्लंडला 145 धावात गुंडाळले. विजयासाठी 192 धावांचे आव्हान मिळाल्यावर हे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात पार करत सामना आणि मालिका खिशात घातली आहे.
याबरोबरच रांची कसोटी सामन्यात ध्रुव जुरेल टीम इंडियाच्या विजयाचा ‘हिरो’ ठरला आहे. रांची कसोटी सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या डावात ध्रुव जुरेलने महत्त्वपूर्ण खेळी केली. तसेच ध्रुव जुरेलने पहिल्या डावात खेळलेली 90 धावांची खेळी खूप खास होती. ज्याच्या जोरावर टीम इंडियाने सामन्यात चांगले पुनरागमन केले होते. यानंतर ध्रुव जुरेलने चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात टीम इंडियाचा विजय होईपर्यंत संर्घष करत होता.
Dhruv Jurel impressed everyone with resilient knocks with the bat in both the innings 👏👏
He becomes the Player of the Match in Ranchi 🏆
Scorecard ▶️ https://t.co/FUbQ3MhXfH#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/SBu4LVbn7C
— BCCI (@BCCI) February 26, 2024
अशातच पहिल्या डावात भारतीय संघाची फलंदाजी थोडी ढासळलेली होती. एकापाठोपाठ एक विकेट पडल्याने टीम इंडिया पहिल्या डावात थोडी अडचणीत सापडली होती. यानंतर ध्रुव जुरेलने केवळ भारतीय डाव सांभाळला नाही तर 90 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्यामुळे भारतीय संघाला पहिल्या डावात 300 च्या पुढे धावा करण्यात यश आले. यानंतर दुसऱ्या डावातही टीम इंडियाला झटपट 3 धक्के बसले. यानंतर ध्रुव जुरेलसह शुभमन गिलने डाव सांभाळला आणि भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ध्रुवच्या या चमकदार कामगिरीमुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ देखील देण्यात आला आहे.
A fantastic victory in Ranchi for #TeamIndia 😎
India clinch the series 3⃣-1⃣ with the final Test to be played in Dharamsala 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/FUbQ3MhXfH#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/5I7rENrl5d
— BCCI (@BCCI) February 26, 2024
दरम्यान, कार अपघातानंतर ऋषभ पंत टीम इंडियातून बाहेर आहे, त्यानंतर टीम इंडिया एका चांगल्या यष्टीरक्षक फलंदाजाच्या शोधात होती. आता ऋषभ पंतही पुनरागमन करण्याच्या तयारीत असला तरी त्याच्या पुनरागमनानंतर त्याचा फॉर्म कसा असेल हे मोठे ठरणार आहे. याशिवाय जर आपण इशान किशनबद्दल बोललो तर तो दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेतून विश्रांती घेतल्यानंतर टीम इंडियाच्या बाहेर आहे आणि दरम्यान तो रणजी ट्रॉफी 2024 मध्ये एकही सामना खेळलेला नाही.
महत्वाच्या बातम्या –
- IPL 2024 : आयपीएल 2024 पूर्वी हार्दिक पांड्या परतला मैदानात, करतोय ‘या’ संघाचे नेतृत्व
- सोशल मीडियावर रजत पाटीदार ट्रोल, चाहते म्हणाले कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याची वेळ आली…