सध्या आयपीएल स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता प्रत्येक खेळाडू स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. तर काही खेळाडूंना स्पर्धेपूर्वी जाहिराती मिळाल्या असून त्याच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. अशाच प्रकारे भारतीय संघाचा टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या IPL 2024 च्या आधी तब्बल 4 महिन्यांनी क्रिकेटच्या मैदानात परतला आहे. याबरोबरच हार्दिक पंड्या २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान जखमी झाला होता.
याबरोबरच IPL 2024 पूर्वी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले आहे. आता IPL 2024 पूर्वी तंदुरुस्त झाल्यानंतर हार्दिक मैदानात परतला आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये दुखापत झाल्यानंतर हार्दिक पांड्या आता डीवाय पाटील टी-20 चषक स्पर्धेत क्रिकेटच्या मैदानात परतला आहे. हार्दिक DY पाटील T20 कपमध्ये रिलायन्स 1 संघाचे नेतृत्व करत आहे.
तसेच हार्दिक सोबत, रिलायन्स 1 लाइनअपमध्ये टिळक वर्मा, नेहल वढेरा, आकाश मधवाल आणि पियुष चावला सारखे खेळाडू देखील आहेत, जे आयपीएल 2024 च्या आगामी हंगामात हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहेत. तसेच हार्दिक या सामन्यात गोलंदाजी करताना देखील दिसला, याचा अर्थ अष्टपैलू खेळाडू आयपीएल आणि आगामी T20 विश्वचषक 2024 साठी स्वतःला तयार करत आहे. याशिवाय संघाबाहेर असलेला इशान किशनही डीवाय पाटील टी-२० चषकात क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार आहे.
आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी, हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्समध्ये परत केले गेले. त्यानंतर मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला संघाचा नवा कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयामुळे चाहत्यांची निराशा झाली होती. यानंतर हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्सवर बरीच टीका झाली होती. पण आता आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स त्यांचा नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे.
HARDIK PANDYA IS BACK….!!!!
– Hardik is leading Reliance 1 in the DY Patil T20 tournament. pic.twitter.com/hKnuArA5Wu
— Johns. (@CricCrazyJohns) February 26, 2024
दरम्यान, काही दिवसापूर्वी हार्दिक पांड्या आयपीएलसाठी एक शूट करत असल्याचं व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ पोस्टमध्ये सांगितलं आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये हार्दिक पांड्या सुरुवातीला शांत होता. पण डेक्सवर नाश्ता पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली पहायला मिळाली होती.
महत्वाच्या बातम्या –
- सोशल मीडियावर रजत पाटीदार ट्रोल, चाहते म्हणाले कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याची वेळ आली…
- IND Vs ENG : रोहित शर्मा आणि जेम्स अँडरसन यांच्यात बाचाबाची! घ्या जाणून नेमंक काय आहे कारण