---Advertisement---

एकेकाळी ड्रेसिंग रूममध्ये बसून ढसाढसा रडणारा इंग्लंडचा खेळाडू करू शकतो टीम इंडियाला चितपट!

On: मंगळवार, जानेवारी 26, 2021 9:40 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवल्यानंतर भारतीय संघासमोर मायदेशात इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. 5 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात इंग्लंड संघ बहुचर्चित 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात असले तरी, नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यात इंग्लंडने शानदार कामगिरी करत 2-0 ने विजय मिळवला. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या इंग्लंड संघाकडून भारतीय संघाला सावध राहणे गरजेचे असणार आहे. विशेषतः इंग्लंडचा युवा फिरकीपटू डॉम बेस भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो.

बेस सध्या उत्तम फॉर्ममध्ये असून त्याने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की, बेस एकेकाळी डिप्रेशनमुळे ड्रेसिंग रूममध्येच ढसाढसा रडला होता.

ड्रेसिंग रूममध्ये मोठमोठ्याने रडला होता डॉम बेस

बेसने 2018 साली पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात तो एकही बळी टिपू शकला नव्हता. परंतु पुढील दुसर्‍या कसोटी सामन्यात त्याने 3 बळी मिळवले. तथापि त्यानंतर बेसला पुढील 18 महिने आंतरराष्ट्रीय सामना खेळायची संधी मिळाली नाही. यामुळे बेसला नैराश्याने ग्रासले होते. त्यामुळे तो ड्रेसिंग रूममध्ये बसून खूप रडला होता.

2018 साली बेस इंग्लंडचा देशांतर्गत संघ समरसेट संघाकडून सामना खेळत असताना आपल्या फलंदाजीच्या प्रतीक्षेत होता. मात्र याचवेळी संघातील मनोविज्ञान चिकित्सकांशी आपल्या मानसिक स्थितीबद्दल बोलत होता. यादरम्यान बोलताना बेसला रडू आवरले नव्हते. स्वतः बेसनेच या प्रसंगाचा उलगडा एका मुलाखीदरम्यान केला होता. मात्र आता बेस पूर्णतः यातून सावरला असून संघासाठी उत्तम कामगिरी करताना दिसत आहे.

भारतीय फलंदाजांसाठी ठरू शकतो डोकेदुखी

बेसने नुकत्याच श्रीलंकेविरुद्ध झालेल्या मालिकेत अविश्वसनिय गोलंदाजी केली होती. त्याने 2 सामन्यात सर्वाधिक 12 बळी मिळवले आहेत. बेसने आतापर्यंत 12 आतंरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेले असून त्यात त्याने 31 बळी मिळवले आहेत. शानदार फॉर्ममध्ये असलेला बेस भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतही दमदार कामगिरी करू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियापुढे इंग्लंडच्या ‘या’ गोलंदाजांचे आव्हान, श्रीलंकाविरुद्ध कसोटी मालिकेत घेतल्यात २२ विकेट्स

“टी२० मालिका विजयानंतर विराटच्या ‘त्या’ कृत्याने डोळ्यात पाणी आणलं”, नटराजनने व्यक्त केल्या भावना

“इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ‘ही’ गोष्ट केल्यास अर्धी मिशी काढेन”, अश्विनचं पुजाराला अनोखं चॅलेंज 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---