भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. राजकोट कसोटीदरम्यान भारतीय संघाला रविचंद्रन अश्विनच्या रूपाने मोठा फटका बसला. वैद्यकीय कारणामुळे अश्विनला सामन्यातून बाहेर जावे लागले आहे. याशिवाय भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाचा पहिला डाव 445 धावांवर संपला होता.
यानंतर तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडने पहिल्या डावात पाच गडी गमावून 290 धावा केल्या होत्या. तसेच इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला. भारताने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. यामुळे टीम इंडिया दुसऱ्या डावात 126 धावांची आघाडी घेऊन फलंदाजीसाठी उतरेल.
याबरोबरच आज इंग्लंडने 2 बाद 207 धावांवर खेळण्यास सुरुवात केली आणि 112 धावा करताना उर्वरित आठ विकेट गमावल्या आहेत. तसेच इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या दोन सत्रात संपूर्ण बाद झाला आहे. तर शुक्रवारी जेव्हा बेन डकेट आणि जो रुट फलंदाजी करत होते तेव्हा इंग्लिश संघ इतक्या कमी धावसंख्येवर ऑलआऊट होईल, असे कोणालाच वाटले नव्हते. मात्र, भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केलेली पहायला मिळालं आहे.