आज आर अश्विन याच्याशिवाय मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाची जोरदार सुरुवात केली आहे. तसेच टीम इंडियाने इंग्लंडला झटपट 2 झटके देत बॅकफुटवर ढकलण्याचं काम केलं आहे. याबरोबरच जो रूटने रिव्हर्स स्कूप मारण्याचा प्रयत्न करताना स्वतःचे नुकसान केले आणि त्याचा फायदा टीम इंडियाला झाला आहे.
भारतीय संघाचा धोकादायक गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर जो रूटने रिव्हर्स स्कूप मारण्याचा प्रयत्न केला, पण स्लिपमध्ये उभ्या असलेल्या यशस्वी जयस्वालने झेल घेत त्याचा डाव संपवला आहे. तसेच हा प्रकार इंग्लंडच्या 40व्या षटकात घडली आहे. त्यावेळी जसप्रीत बुमराह गोलंदाजीसाठी आला होता. त्यावेळी बेन डकेट आणि जो रुट क्रीजवर उपस्थित होते. जसप्रीत बुमराहच्या षटकातील पाचव्या चेंडूवर जो रूटने रिव्हर्स स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता.
याबरोबरच रूट हा इंग्लंडचा फलंदाज असून त्याला भारतीय परिस्थितीत खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. परंतु आजपर्यंत ते संघाच्या विश्वासावर खरा उतरू शकलेले नासून सलग तिसऱ्या कसोटीतही रूट फ्लॉप ठरला आहे. राजकोटमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या बेन डकेटने 153 धावांची शानदार खेळी केली, तर रूटला 20 धावांचा टप्पाही पार करता आला नाही.
जसप्रीत बुमराहने यासह कसोटी क्रिकेटमध्ये नवव्यांदा जो रूटला आपला शिकार बनवले आहे. तसेच भारताचा हा दौरा जो रूटसाठी आतापर्यंत खूपच निराशाजनक ठरला आहे. याबरोबरच रूटने भारत दौऱ्यावर फलंदाजी करताना 5 डावात 29, 2, 5, 16 आणि 18 धावा केल्या आहेत.
Lightning reflexes from Jaiswal! ⚡️👏
A bright start for Bumrah & #TeamIndia 😍💪 on Day 3! 🔥#INDvENG #JioCinemaSports #BazBowled #IDFCFirstBankTestSeries pic.twitter.com/y4FwWbIX5K
— JioCinema (@JioCinema) February 17, 2024
दरम्यान, जो रूटने इंग्लंडकडून 138 कसोटी सामन्यांमध्ये 49.51 च्या सरासरीने 11486 धावा केल्या आहेत. जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये 30 शतके आणि 60 अर्धशतके केली आहेत. जो रूटचा कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या २५४ धावा आहे. तसेच जो रूटनेही आपल्या कसोटी कारकिर्दीत पाच वेळा द्विशतकही केले आहे. तर जो रूटने 2021 मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकूण 368 धावा केल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या –
- पाकिस्तान सुपर लीगचा 9वा सीझन आजपासून होणार सुरू, जाणून घ्या भारतात कधी, कुठे आणि कसे पाहाल सामने
- रणजी ट्रॉफीत मोठा ड्रामा! अंजिक्य रहाणे बाद होऊनही पुन्हा फलंदाजीला कसा आला, घ्या जाणून नेमकं काय घडलं