---Advertisement---

IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन ठरली, ‘या’ खेळाडूचा 4 वर्षांनी संघात समावेश

On: बुधवार, जुलै 9, 2025 4:13 PM
---Advertisement---

इंग्लंडने भारताविरुद्धच्या आगामी तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंडने संघाने गुरुवारी लॉर्ड्सवर सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर चार वर्षांनी परतला आहे. जोश टँगच्या जागी जोफ्रा आर्चरचा संघात समावेश करण्यात आला आहे. फेब्रुवारी 2021 नंतर आर्चरचा हा पहिलाच कसोटी सामना असणार आहे.

कोपराच्या आणि पाठीच्या दुखापतीतून बरा झाल्यानंतर आर्चर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. त्याने फेब्रुवारी 2021 मध्ये शेवटची कसोटी खेळली होती. मालिकेच्या पहिल्या सामन्यात पाच विकेट्सने विजय मिळवल्यानंतर, एजबॅस्टन येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत यजमान संघाला 336 धावांनी पराभव पत्करावा लागला. यासह, भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

या सामन्यासाठी भारतीय संघाचा प्लेइंग इलेव्हन कोणता असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु भारतीय संघातही किमान एक बदल दिसून येईल अशी अपेक्षा आहे. लॉर्ड्सची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल असे मानले जात आहे, त्यामुळे जसप्रीत बुमराह पुनरागमन करताना दिसेल, त्याच्या जागी प्रसिद्धला बाहेर जावे लागू शकते. तथापि, भारतीय कर्णधार शुबमन गिल नाणेफेकीच्या वेळी संघाचे प्लेइंग इलेव्हन जाहीर करेल.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---