महिला विश्वचषकात(Womens World Cup 2022) मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा चौथा सामना बुधवारी( १६ मार्च) इंग्लंडविरुद्ध पार पडला. या सामन्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडने या सामन्यात भारताला ४ धावांनी पराभूत केले. या सामन्यात भारतीय उप-कर्णधार हरमनप्रीत कौरने शानदार झेल घेतला. तिने घेतलेल्या झेलचा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.
इंग्लंडच्या डावाच्या २५ व्या षटकात राजेश्वरी गायकवाडच्या चेंडूवर एमी जोन्सचा झेल हरनमप्रीतने घेतला. मधल्या भागात उभी असलेल्या हरमनप्रीतने मागे जात उडी मारली आणि झेल घेतला. यादरम्यान ती खाली पडत पुर्णपणे फिरली, परंतु तिने तो झेल सोडला नाही. तिच्या कॅचचा व्हिडीओ आयसीसीने सुद्धा शेअर केला आहे. या व्हिडीओला एक लाखांहून अधिक लाइक्स आल्या आहेत. यानंतर काही वेळेतच क्षेत्ररक्षण करताना तिला दूखापत झाली. तिला सामना समाप्त होण्याअगोदरच मैदानावरुन बाहेर झाली.
https://www.instagram.com/reel/CbJ0wRaFVOq/?utm_source=ig_embed&ig_rid=96664543-3469-439a-b081-9a9efd6f5e6c
भारत आणि इंग्लंडच्या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत १३४ धावा केल्या, यामध्ये सलामीवीर स्म्रीती मंधानाने सर्वाधिक ३५ धावा केल्या. तसेच रीचा घोषने ३३ आणि झूलन गोस्वामीने २० धावा केल्या. मिताली राजने फक्त १ धाव काढली आणि तंबू गाठला. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने ३१.२ षटकातच १३४ धावा केल्या आणि भारतावर ४ विकेट्सने विजय मिळवला. भारताच्या मेघना सिंगने ३ विकेट घेतल्या. तर राजेश्वरी गायकवाड, झूलन गोस्वामी आणि पुजा वस्राकरने प्रत्येकी १ विकेट घेतल्या.
भारतीय महिला संघाने विश्वटषकात दोन सामने जिंकले आहेत, तर दोन सामन्यांमध्ये संघाला अपयश आले आहे. भारत आता ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश या संघांविरुद्ध सामने खेळणार आहे. भारताने वेस्टइंडिज आणि पाकिस्तान संघांना पराभूत केले आहे, तर न्यूझीलंड आणि इंग्लंड संघांविरुद्ध त्यांना अपयश आले आहे. तर इंग्लंडचा हा पहिलाच विजय आहे, संघाला मागील तिनही सामन्यात अपयश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
क्षणिक सुख! रविंद्र जडेजाने गमावला ‘नंबर १’चा ताज, ‘या’ धाकड अष्टपैलूची अव्वलस्थानी उडी
इंग्लंडविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतरही भारतीय संघ विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणार, पाहा कसं?
विजयरथावर स्वार रोहित बनणार विराटपेक्षा यशस्वी कर्णधार, क्रिकेट दिग्गजाची मोठी भविष्यवाणी