India vs England Test Series: जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. उभय संघांमधील ही मालिका 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे. भारत आणि इंग्लंड हे दोन्ही क्रिकेट जगतातील बलाढ्य संघ आहेत, त्यामुळे चाहतेही या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही पाच सामन्यांची कसोटी मालिका असेल. 25 जानेवारीपासून दोन्ही संघांमधील सामना सुरू होणार आहे. भारत आणि इंग्लंड या दोन्ही क्रिकेट विश्वातील सर्वात मोठे संघ आहेत, त्यामुळे चाहते आणि प्रतिस्पर्धी त्यांना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी इंग्लंडचा गोलंदाज स्टीव्ह हार्मिसन यानेही प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना स्टीव्ह हार्मिसन (Steve Harmison) म्हणाला की, “भारतीय वातावरण आणि संधी लक्षात घेता संघाची फलंदाजी रोहित शर्मा आणि विराट कोहली (Rohit Sharma & Virat Kohli) यांच्यावर बरीच अवलंबून असेल. इंग्लंड संघाला आपल्या फलंदाजीत काही कमकुवतपणा जाणवेल. मी जेव्हा भारताचा दौरा केला तेव्हा संघात वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण सारखे मोठे फलंदाज होते. सर्व उत्कृष्ट खेळाडू होते. मला खात्री आहे की, भारतीय संघाची ही बॅटिंग लाइनअप पहिल्यासारखी भितीदायक नाही.”
हार्मिसन पुढे म्हणाला की, “शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर सारखे अनेक चांगले खेळाडू आहेत. पण पांढऱ्या चेंडूच्या तुलनेत लाल चेंडूत ते तितके प्रभावी खेळाडू आहेत असे मला वाटत नाही.अशा परिस्थितीत या मालिकेत भारतीय संघाचे फलंदाज कशी कामगिरी करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.”
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना अजूनही या संघात स्थान मिळालेले नाही. अशा स्थितीत भारताच्या युवा फलंदाजांवर मोठी जबाबदारी असेल. शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल या फलंदाजांना या मालिकेत चमकण्याची चांगली संधी आहे. (IND vs ENG India’s batting depends on Virat-Rohit former English bowler’s big statement)
हेही वाचा
AUS vs WI 1st Test । लाईव्ह सामन्यातील स्मिथचं ‘हे’ काम नेहमी लक्षात राहणार! नवख्या खेळाडूसोबत काय केलं पाहाच
कसोटी क्रिकेट वाचवायचंय तर ‘हा’ उपाय करा! इंग्लिश दिग्गजाचा मोठ्या क्रिकेट बोर्डांना सल्ला