---Advertisement---

जसप्रीत बुमराहने कसोटीमध्ये रचला इतिहास, इंग्लंडमध्ये पूर्ण केला खास ‘अर्धशतक’

On: रविवार, जुलै 27, 2025 8:37 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय संघाने 358 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे इंग्लंड संघाने 669 धावा केल्या आणि 311 धावांची आघाडी घेतली. चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने दोन बळी घेतले.

चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात एक बळी घेऊन जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या भूमीवर 50 कसोटी बळी पूर्ण करत एक खास अर्धशतक पूर्ण केले. यानंतर, जेव्हा त्याने दुसरी विकेट घेतली तेव्हा त्याने इशांत शर्माची बरोबरी केली. आता भारतासाठी इंग्लंडमध्ये कसोटीत सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत बुमराह आणि इशांत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत. दोघांच्याही इंग्लंडमध्ये 51-51 कसोटी बळी आहेत.

इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी बळी घेणारे भारतीय गोलंदाज:

जसप्रीत बुमराह- 51 बळी
इशांत शर्मा- 51 बळी
कपिल देव- 43 बळी
मोहम्मद शमी- 42 बळी
मोहम्मद सिराज- 37 बळी

जसप्रीत बुमराहने 2018 मध्ये भारतीय संघासाठी कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून तो भारतीय गोलंदाजी आक्रमणातील एक महत्त्वाचा दुवा बनला आहे. त्याने अनेक परदेशी दौऱ्यांवर आपल्या गोलंदाजीची कौशल्ये दाखवली आहेत. इंग्लंडपूर्वी, त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गोलंदाजीचा नमुना सादर केला. त्याने आतापर्यंत 58 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 219 बळी घेतले आहेत, ज्यात 15 फाईव्ह विकेट हाॅलचा समावेश आहे.

चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात 311 धावांनी पिछाडीवर राहिल्यानंतर, भारतीय संघाने 2 बळी गमावून 174 धावा केल्या आहेत आणि टीम इंडिया अजूनही 137 धावांनी मागे आहे. कर्णधार शुबमन गिल आणि केएल राहुल क्रीजवर आहेत. दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करत आहेत. गिलने 78 धावा केल्या आहेत आणि राहुलने 87 धावा केल्या आहेत. त्याआधी यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन यांना खातेही उघडता आले नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---