भारत आणि इंग्लंडयांच्यामध्ये पाच सामन्यांच्या मालिकेत रोहितसेनेने तिसरा कसोटी सामना जिंकत 2-1 ने आघाडी घेतली आहे. जर चौथा सामनाही टीम इंडियाने जिंकला तर मालिका टीम इंडिया खिशात घालणार आहे. तसेच भारत आणि इंग्लंडमधील चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीदरम्यान असणार आहे. हा सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. सामना सकाळी 9.30 वाजता सुरू होणार आहे. तसेच भारताविरुद्धच्या सध्याच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा महान कसोटी फलंदाज जो रूट अत्यंत खराब फॉर्ममध्ये आहे.
जो रूटने आत्तापर्यंत खेळलेल्या पहिल्या 3 कसोटी सामन्यात त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. आता रांची येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने त्याला एक सल्ला दिला आहे. तसेच भारत आणि इंग्लंड यांच्यातील रांची कसोटी सामना 23 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार असून या मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे.
याबरोबरच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयान चॅपेलने इंग्लंडचा फलंदाज जो रूटला त्याची ‘बझबॉल’ शैली सोडून नैसर्गिक खेळ करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत रुट धावा करण्यासाठी धडपडत असून गेल्या 6 डावात त्याला केवळ 29 धावा करता आल्या आहेत.
अशातच चॅपलने ‘बझबॉल’ला ‘अत्यंत खराब रणनीती’ असे संबोधले आणि म्हटले आहे की, ‘रूटचा त्याच्या नैसर्गिक खेळाचा विक्रम आश्चर्यकारक आहे. आपल्या नैसर्गिक खेळाने तो पटकन धावाही करू शकतो. तसेच तो पुढे म्हणाला आहे की, ‘मला कळत नाही की तो आपला खेळ इतका का बदलतोय. मी कधीच पूर्वनिर्धारित शॉट्स खेळण्याच्या बाजूने नाही. कसोटीत 11,000 हून अधिक धावा करणाऱ्या रूटला तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहविरुद्ध रिव्हर्स स्कूप खेळल्यामुळे टीकेला सामोरे जावे लागले होते. तर हा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात रुट स्लिपमध्ये झेलबाद झाला होता.
दरम्यान, राजकोट कसोटीत रुटची विकेट पडली तेव्हा इंग्लंडची धावसंख्या दोन बाद २२४ धावा होती. यानंतर संघाने 95 धावांत शेवटच्या आठ विकेट्स गमावून सामना देखील गमावला होता. इंग्लंडने हा सामना 434 धावांनी गमावला, जो 1934 नंतरचा धावांच्या बाबतीत सर्वात मोठा पराभव आहे. तसेच जो रूटने भारतात 28 कसोटी खेळलेल्या असून 50 पेक्षा जास्त सरासरीने 2603 धावा केल्या आहेत. त्याने 9 शतके आणि 10 अर्धशतकेही केली आहेत. अशा स्थितीत रांची कसोटीत भारतीय गोलंदाजांचा जो रूट कसा सामना करतो हे पहावे लागणार आहे.
चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ :-
रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (WK), केएस भरत (WK), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.
महत्वाच्या बातम्या –