---Advertisement---

‘लाईक फाॅर लाईक रिप्लेसमेंट…’, टीम इंडियाच्या या निर्णयावर जोस बटलरची बोचरी टीका

---Advertisement---

शिवम दुबेच्या जागी हर्षित राणा खेळल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. एकीकडे इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने टीम इंडियाच्या या निर्णयावर निशाणा साधला आहे. याशिवाय, अनुभवी क्रिकेटपटू केविन पीटरसन आणि मायकेल वॉन यांनीही या कन्कशन पर्यायी वादावर संताप व्यक्त केला आहे. खरंतर, भारत-इंग्लंड चौथ्या टी20 सामन्यात फलंदाजी करताना शिवम दुबेच्या हेल्मेटवर चेंडू लागला. ज्यामुळे फिल्डिंग करताना त्याच्या जागी हर्षित राणाला खेळवण्यात आले. दुबे हा अष्टपैलू खेळाडू आहे तर हर्षित गोलंदाज असल्याने वाद निर्माण झाला. सामन्यात हर्षितने 3 विकेट्स घेत सामना फिरवला.

सामन्यादरम्यान बोलताना इंग्लंडचा दिग्गज खेळाडू केविन पीटरसन म्हणाला, “मी असे म्हणू शकत नाही की हे ‘लाईक फाॅर लाईक’ रिप्लेसमेंट आहे. जोस बटलर या पर्यायी खेळाडूवर खूश नव्हता. तो बाद झाल्यानंतर खूप रागावलेला दिसत होता. आऊट झाल्यानंतर तो थेट मैदानात गेला. यानंतर त्याने प्रशिक्षकाशी बोलले, कारण त्याला ही बदली ‘लाइक फॉर लाईक’ वाटत नव्हती.”

आयसीसीच्या नियमांनुसार, कोणतीही खेळाडू दुखापती झाल्यास, सामनाधिकारी फक्त ‘लाईक फॉर लाईक’ यादीत असलेल्या खेळाडूलाच बदलू शकतात. याचा अर्थ असा की एका गोलंदाजाची जागा दुसऱ्या गोलंदाजाला घेता येते. तर फक्त एक फलंदाजच फलंदाजाची जागा घेऊ शकतो. चौथ्या पुणे टी20 मध्ये अष्टपैलू शिवम दुबेच्या जागी गोलंदाज हर्षित राणाला संघात आणण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला.

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाला, “ही ‘लाईक फाॅर लाईक’ रिप्लेसमेंट नव्हती. आम्ही याच्याशी अजिबात सहमत नाही. असो  हे सगळं खेळाचा भाग आहे आणि आपण सामना जिंकण्याचा विचार करायला हवा होता. पण आम्ही या निर्णयावर अजिबात समाधानी नाही.”

हेही वाचा-

हार्दिक पांड्या टीम इंडियाचा नवा फिनिशर..! याबाबतीत माजी कर्णधार धोनी-विराटला टाकले मागे
“हा निर्णय हेड कोच…”, वादग्रस्त ‘कन्कशन सबस्टिट्यूट’ नियमावर हर्षित राणाची मोठी प्रतिक्रिया
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 2017 च्या चॅम्पियन संघातील 3 खेळाडूंचा समावेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---