---Advertisement---

झॅक क्रॉलीच्या कृतीवर माजी कर्णधार भडकला नाही, उलट टीम इंडियालाच दिला धडा!

On: रविवार, जुलै 13, 2025 3:09 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी नाट्य आणि तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. दिवसाच्या अखेरच्या क्षणांत इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉलीने वेळकाढूपणा करत सामन्याची गती मंदावली, ज्यामुळे भारतीय खेळाडूंमध्ये संतापाची लाट उसळली. मात्र या घटनेवर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने वेगळीच भूमिका घेतली असून, त्याने क्रॉलीच्या कृतीचं समर्थन करत भारतीय संघालाच सल्ला दिला आहे.

तिसऱ्या दिवशी भारताने आपल्या पहिल्या डावात 387 धावा केल्या आणि नंतर इंग्लंडला अखेरच्या सत्रात फलंदाजीस उतरवलं. नियमानुसार भारताला दोन ओव्हर टाकण्याची संधी होती. मात्र झॅक क्रॉलीने अचानक दुखापतीचं नाटक, क्रीजमधून सतत बाजूला होणं, आणि बुमराहला वारंवार थांबवणं अशा अनेक क्लृप्त्या वापरून सामना पुढे रेटला. यामुळे भारताला फक्त एकच ओव्हर टाकता आली आणि इंग्लंडने दोन धावा करत दिवसाचा खेळ संपवला.

या प्रकारामुळे भारतीय कर्णधार शुबमन गिलसह संपूर्ण संघ नाराज झाला आणि मैदानातच तीव्र प्रतिक्रिया दिली. मात्र मायकल वॉनने ‘बीबीसी टेस्ट मॅच स्पेशल पॉडकास्ट’मध्ये प्रतिक्रिया देताना क्रॉलीच्या कृतीचं कौतुक केलं. वॉन म्हणाला, “ही वेळ वाया घालवण्याची आजवरची सर्वोत्तम उदाहरणं होती. मी हे पाहून फक्त हसत होतो. भारताने यावर नाराज होण्याचं कारण नाही, कारण त्यांनीही दुसऱ्या दिवशी अशाच क्लृप्त्या वापरल्या.”

वॉनच्या मते अशा घटना टेस्ट क्रिकेटचं खास वैशिष्ट्य आहेत आणि त्यामुळेच सामन्यात अधिक रंगत येते. त्याने नमूद केलं की सामना आता निर्णायक वळणावर आहे. चौथ्या आणि पाचव्या दिवसाचे खेळ अत्यंत रोमांचक ठरण्याची शक्यता असून, इंग्लंड दुसऱ्या डावात चांगली खेळी करत भारतापुढे मोठं लक्ष्य ठेवण्याचा प्रयत्न करेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---