---Advertisement---

IND vs ENG; वनडे मालिकेत कोणाचे पारडे जड? मालिकेपूर्वी पाहा संघाचे हेड टू हेड रेकाॅर्ड्स!

---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 06 फेब्रुवारीपासून सुरू होईल. भारतीय संघाने 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत पाहुण्या संघाचा 4-1 असा पराभव केला. या विजयानंतर भारताचे मनोबल उंचावले आहे. मात्र, सूर्यकुमार यादवने टी20 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले तर रोहित शर्मा एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करेल. घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध भारताचा वनडे सामन्यांमध्ये रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण यानंतर दोन्ही संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी रवाना होतील. मालिकेपूर्वी, घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध भारताचा रेकॉर्ड कसा आहे ते जाणून घेऊया.

भारताने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर 52 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या दरम्यान टीम इंडियाने 34 सामने जिंकले आहेत. तर 17 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. एक सामना बरोबरीत सुटला आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 1.30 वाजता खेळला जाईल. एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शुबमन गिल आणि केएल राहुल सारखे खेळाडू आहेत जे टी20 मालिकेचा भाग नव्हते. हे सर्व खेळाडू ताजेतवाने होऊन संघात परतत आहेत. या मालिकेत गिल भारतीय संघाचा उपकर्णधार असेल.

भारत आणि इंग्लंडमध्ये आतापर्यंत 107 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. भारताने 58 तर इंग्लंडने 44 सामने जिंकले आहेत. तर तीन सामने अर्निर्णीत तर दोन सामने बरोबरीत सुटले. भारतीय संघाने घरच्या मैदानावर आणि परदेशात इंग्लंडवर वर्चस्व गाजवले आहे. दोन्ही ठिकाणी संघाचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. एकदिवसीय मालिकेतही टीम इंडियाचा दबदबा असणार आहे.

भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश आहे.

इंग्लंड संघ- जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अ‍ॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वूड

हेही वाचा-

52 वर्षांच्या सचिनची जोरदार फटकेबाजी; फलंदाजी पाहून तुम्हीही म्हणाल, ‘देव तो देवच’, VIDEO
Rahul Dravid: बेंगलोरमध्ये द्रविडच्या गाडीची रिक्षाला धडक, भांडणाचा व्हिडीओ व्हायरल
Champions Trophy; ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का.! संघाचा कर्णधार स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---