येत्या ४ ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. ही कसोटी मालिका भारतीय संघाचा दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना नॉटिंघम ट्रेंट ब्रिज स्टेडियम, नॉटिंघम येथे खेळला जाणार आहे. तत्पुर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळपट्टीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पहीला कसोटी सामना ४-८ ऑगस्ट दरम्यान नॉटिंघममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ नॉटिंघममध्ये दाखल झाला असून त्यांनी सरावाला देखील सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर हा सामना ज्या खेळपट्टीवर होणार आहे, त्या खेळपट्टीचा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा फोटो बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
या फोटोमध्ये खेळपट्टीवर पूर्णपणे हिरवेगार गवत दिसून येत आहे. यावरून एक गोष्ट निश्चित आहे की, या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल. यामुळे भारतीय संघातील फलंदाजांच्या चिंता वाढू शकतात. इंग्लिश संघातील खेळाडूंनी देखील सरावाला कसून सुरुवात केली आहे. ज्याचे फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Ind vs Eng :Pitch report of Trent bridge Nottingham)
नॉटिंघमच्या खेळपट्टीकडून फलंदाज अन् गोलंदाजांना कितपत फायदा?
भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक जिंकेल, तो संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. या खेळपट्टीवर पहिल्या आणि दुसऱ्या डावात फलंदाजांना मदत मिळू शकते. तर तिसऱ्या आणि चौथ्या डावात गोलंदाजांना अधिक मदत मिळू शकते.
A big hello 👋 from Trent Bridge. Our venue for the 1st Test against England.#ENGvIND pic.twitter.com/79cVVcf3JH
— BCCI (@BCCI) August 1, 2021
A look at the wicket three days out from the 1st Test at Trent Bridge.
Thoughts 🤔#ENGvIND pic.twitter.com/hcUrP3NzbX
— BCCI (@BCCI) August 1, 2021
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी,रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल, रिद्धीमान साहा, अभिमन्यु ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव
राखीव खेळाडू : प्रसिद्ध कृष्णा, अरजन नगवासवाला
महत्त्वाच्या बातम्या-
सिंपल बट स्वीट!! विराट अन् अनुष्काच्या ‘त्या’ सिंपल लूकमधील फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष