---Advertisement---

रांची कसोटीत अश्विनचा महाविक्रम! ‘अशी’ कामगिरी करणारा भारतातील नाही तर आशियातील पहिला गोलंदाज

On: शुक्रवार, फेब्रुवारी 23, 2024 12:25 PM
Ravichandran Ashwin
---Advertisement---

रांची कसोटी सामन्याची सुरुवात भारतीय संघाने आपल्या इच्छेप्रमाणे केले. नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांनी पाहुण्या संघाचे कंबरडे पहिल्याच सत्रात मोडले. पदार्पणाच्या सामन्यात आकाश दीप याने गुणवत्ता सिद्ध केली. तसेच रविचंद्रन अश्विन यानेही शुक्रवारी पहिली विकेट घेत आपल्या नावावर मोठा विक्रम केला.

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील कसोटी मालिकेचा चौथा सामना शुक्रवारी (23 फेब्रुवारी) रांचीमध्ये सुरू झाला. पहिल्या तीन सामन्यांनंतर भारत 2-1 अशा आघाडीवर आहे. अशात चौथ्या कसोटीत विजय मिळवून मालिका जिंकण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा आहे. शुक्रवारी रांची कसोटीची सुरुवात देखील भारताच्या मनाप्रमाणे झाली. आकाश दीप याच्यासाठी हा पदार्पणाचा सामना आहे. पदार्पणाच्या सामन्यात त्याने पहिल्याच सत्रात तीन महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या. बेन डकेट (11), ओली पोप (0) आणि झॅक क्रॉली (42) हे सुरुवातीचे तीन धक्के आकाशनेच इंग्लंडला दिले.

जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याच्या रुपात इंग्लंडने डावातील चौथी विकेट गमावली. भारताचा महान फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने बेअरस्टोला पायचीत केले. 35 चेंडूत 38 धावांची खेळी केल्यानंतर बेअरस्टो तंबूत परतला. दुसरीकडे अश्विनने इंग्लंडविरुद्ध आपल्या 100 कसोटी विकेट्स पूर्ण केल्या. इंग्लंडविरुद्ध 100 कसोटी विकेट्स घेणारा अश्विन पहिलाच भारतीय गोलंदाज आहे.

अश्विनने गोलंदाजीसोबत फलंदाजी देखील चांगली करतो. इंग्लंडविरुद्ध त्याने 100 कसोटी विकेट्स पूर्ण केल्याच. पण फलंदाजाच्या रुपात त्याने इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत 1085 धावाही केल्या आहेत. गोलंदाजाच्या रुपात 100 कसोटी विकेट्स आणि फलंदाज म्हणून 1000 धावा इंग्लंडविरुद्ध करणारा अश्विन पहिलाच आशियाई क्रिकेटपटू देखील ठरला.

दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर पहिल्या सत्रानंतर इंग्लंडची धावसंख्या 5 बाद 112 धावा होत्या. (100th Wicket for Ravichandran Ashwin against England. )

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
इंग्लंड: झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन

भारत: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, आकाश दीप (पदार्पण), कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

महत्वाच्या बातम्या – 
INDvsENG । रांची कसोटीत इंग्लंड करणार प्रथम फलंदाजी, भारताकडून अजून एका खेळाडूचे कसोटी पदार्पण
IPL 2024 : अखेर आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ दोन संघात रंगणार आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा पहिला सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---