भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील चौथा कसोटी सामना रांची येथे खेळला जात आहे. जिथे, पदार्पण करणाऱ्या आकाशदीपने विकेट घेण्यास सुरुवात केली आणि 3 इंग्लिश फलंदाजांना बाद केले. यानंतर रविचंद्रन अश्विनने जॉनी बेअरस्टोला बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बेअरस्टोला बाद करून अश्विनने मोठी कामगिरी केली होती.
याबरोबरच, चौथ्या कसोटीतील 79 व्या षटकात रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच कर्णधार पद संभाळताना दिसला होता. तसेच अश्विनला त्याच्या 99व्या कसोटी सामन्यात प्रथमच ही जबाबदारी मिळाली आहे. कारण इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत उपकर्णधार असलेला जसप्रीत बुमराह रांची कसोटीतून बाहेर झाल्यामुळे या सामन्यासाठी अश्विनला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
तसेच इंग्लंडच्या फलंदाजीच्या 79 व्या षटकात भारतीय कर्णधार रोहित शर्माने मैदान सोडले होते. तेव्हा संघाचा उपकर्णधार रविचंद्रन अश्विन संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. या षटकात रवींद्र जडेजा गोलंदाजी करत होता. मात्र, अवघ्या एका षटकानंतर रोहित शर्मा मैदानात परतला आणि पुन्हा कर्णधार करताना दिसला होता. तसेच अश्विनसाठी हा खूप अभिमानाचा क्षण देखील होता.
दरम्यान, इंग्लंडने टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. आर अश्विन याने या सामन्यात वैयक्तिक पहिली विकेट घेत हे खास शतक पूर्ण केलं. अश्विन याने यासह ऐतिहासिक कामगिरी केली. अश्विनने एका टीम विरुद्ध 100 विकेट्स आणि 1 हजार धावा पूर्ण केल्या. अश्विन एका टीम विरुद्ध विकेट्सचं शतक आणि हजार धावा करणारा पहिला आशियाई खेळाडू ठरला होता.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव,आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.
महत्वाच्या बातम्या –





