ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ अधिक टी२० मालिका खेळण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतेच भारताने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिका खेळली आहे. त्यानंतर भारताचा एक संघ हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली आयर्लंड दौऱ्यात दोन सामन्यांची टी२० मालिका जिंकला. आता भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून त्यामध्ये ७ जुलैपासून तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारताचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) करणार नाही.
रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) जवळच्या सूत्राने सांगितले की, रोहित पूर्णपणे तंदुरूस्त असून तो लवकरच संघाशी जोडला जाणार आहे. आगामी वनडे आणि टी२० मालिकेसाठी तो खेळण्यास तयार आहे. भारतीय संघ ७, ९ आणि १० जुलेैला इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. यातील शेवटचा सामना वनडे सामना १७ जुलैला मॅनचेस्टर येथे खेळला जाणार आहे.
इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील पहिला वनडे सामना २२ जुलैला आणि शेवटचा टी२० सामना ७ ऑगस्टला खेळणार आहे. यामध्ये भारत तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे.
रोहित एजबस्टन येथे सुरू असणाऱ्या कसोटी सामन्यात कोरोनामुळे खेळू शकला नाही. त्याच्याऐवजी जसप्रीत बुमराह या सामन्यात संघाचे नेतृत्व करत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड वनडे आणि टी२० सामन्यांसाठी भारताने संघ जाहीर केला असून रोहितकडे कर्णधारपद सोपवलेे आहे. यावरून सिद्ध होते की रोहित या सामन्यांमध्ये खेळणार आहे.
पहिल्या T20 साठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षरो पटेल, रवी बिश्नोई. , भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-२० साठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, उमरान मलिक
3 एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षरा पटेल, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘प्रिय बीसीसीआय, बुमराहला कसोटीचा नियमित कर्णधार बनवा’; चाहत्यांकडून होतेय जोरदार मागणी
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
जडेजाचे शतक अन् बुमराहची फटकेबाजी! वाचा सामन्याच्या दुसऱ्या दिवशी काय काय घडलं