---Advertisement---

IND vs ENG : सरफराज खानने पदार्पण कसोटीतच केला मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा तिसराच फलंदाज

On: रविवार, फेब्रुवारी 18, 2024 4:18 PM
---Advertisement---

मुंबईकर युवा फलंदाज सरफराज खान याने इतिहास रचला आहे. सरफराज खान याने आपल्या कसोटी कारकीर्दीची अविस्मरणीय सुरुवात केली आहे. सरफराज खान याने कसोटी पदार्पणात इंग्लंड विरुद्ध राजकोट येथे सलग दुसरं अर्धशतक ठोकलं आहे. सरफराज खानने 65 बॉलमध्ये 5 चौकार आणि 1 सिक्स ठोकत हे अर्धशतक केलं आहे.

याबरोबरच सरफराज खान याने पहिल्या डावात 48 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं. तसेच सरफराजने पहिल्या डावातील या अर्धशतकी खेळीत 7 चौकार आणि 1 सिक्स मारला होता. मात्र तो दुर्देवी ठरला. रवींद्र जडेजाच्या चुकीच्या कॉलमुळे सरफराज नॉन स्ट्राईक एंडवर रन आऊट झाला होता. यावेळी सरफराज 62 धावांवर रन आऊट झाल्याने कॅप्टन रोहित शर्मा हा देखील जडेजावर चांगलाच संतापला होता. मात्र त्यानंतर सरफराजने सलग दुसऱ्या डावातही अर्धशतक केलं आहे.

अशातच सरफराजने केवळ अर्धशतक ठोकलं नाही, तर आपला मुंबईकर साथीदार यशस्वी जयस्वाल यालाही चांगली साथ दिली. यशस्वीने या दरम्यान मालिकेतील आणि कारकीर्दीतील दुसरं द्विशतक केलं. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 159 बॉलमध्ये नाबाद 172 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर कॅप्टन रोहित शर्माने टीम इंडियाचा डाव हा 430 धावांवर घोषित केला. यशस्वी जयस्वालने नाबाद 214 आणि सरफराजने 68 धावा केल्या. सरफराजने 72 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 68 धावा केल्या आहेत.

दरम्यान, सरफराज खानने कसोटी पदार्पणाच्या दोन्ही डावांत पन्नासहून अधिक धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो केवळ चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. या यादीत दिलवर हुसेन पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर सुनील गावस्करने पदार्पणाच्या कसोटीच्या दोन्ही डावात पन्नासहून अधिक धावा केल्या. तर तिसरा भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर हा आहे, ज्याने पदार्पणाच्या कसोटीच्या दोन्ही डावात पन्नास धावांचा आकडा पार केला होता. आता या यादीत सरफराज खानचा देखील समावेश झाला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---