लीड्समध्ये सुरु असलेल्या भारत-इंग्लंड कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी एक रंगतदार प्रसंग पाहायला मिळाला. मैदानावर आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जाणारा भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला आपल्या आक्रमकतेचा चांगलाच फटका बसला, कारण इंग्लंडचा स्टार फलंदाज हैरी ब्रूक याने त्याच्या ओव्हरमध्ये धुवून काढले.
घटना इंग्लंडच्या पहिल्या डावातील 84व्या षटकात घडली. सिराजचा एक चेंडू ब्रूकच्या पॅडवर लागल्यानंतर सिराज त्याच्याकडे रोखून पाहू लागला. ब्रूकने त्याला पाहून हात हलवला आणि तिथूनच नोंकझोंक सुरू झाली. दरम्यान दोघांमध्ये थोडा शब्दांचा खेळही झाला. मात्र याचा सर्वाधिक फायदा ब्रूकलाच झाला.
👀😯🗣️ Tensions rising in the middle!#MohammedSiraj and #HarryBrook in a fiery exchange as the heat is on at Headingley! 🔥#ENGvIND 1st Test Day 3 LIVE NOW Streaming on JioHotstar 👉 https://t.co/SIJ5ri9fiC pic.twitter.com/nKZTSeFZt1
— Star Sports (@StarSportsIndia) June 22, 2025
या नोंकझोंकनंतर ब्रूकने सिराजला जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्याच षटकात 6, 4, 4 अशी सलग तीन चौकार-षटकारांची आतषबाजी करत त्याने दबदबा निर्माण केला. त्याच्या खेळीत आत्मविश्वास ठासून भरलेला दिसून आला. विशेष म्हणजे, याच्या अगोदरच्याच षटकात यशस्वी जायस्वालने ब्रूकचा झेल सोडला होता.
ब्रूकने दमदार खेळी करत 99 धावांवर मजल मारली, परंतु तो शतकापासून केवळ एक धाव दूर असताना प्रसिद्ध कृष्णाने त्याला माघारी पाठवले. दुसरीकडे ओली पोपने शतकी खेळी केली आणि इंग्लंडने भारताच्या 471 धावांच्या उत्तरात पहिला डाव 465 धावांत पूर्ण केला.
तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 90 धावा केल्या असून आघाडी 96 धावांची झाली आहे. केएल राहुल अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असून त्याला कर्णधार शुबमन गिल साथ देतो आहे.