IND vs ENG: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तीन सामने पूर्ण झाले आहेत. तिसरा सामना राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळवण्यात आला. आता चौथा टी20 सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यासाठी टीम इंडिया पुण्यात पोहोचली आहे. ज्याची माहिती बीसीसीआयमार्फत देण्यात आली आहे.
पुणे टी20 सामना उद्या म्हणजे 31 जानेवारी, शुक्रवारी खेळला जाईल. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. तर टॉस संध्याकाळी 6.30 वाजता होईल. बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंचे पुण्यात पोहोचल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावरून शेअर केले.
मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास, तीन सामन्यांनंतर टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत, पुण्यात खेळला जाणारा चौथा टी20 सामना जिंकून टीम इंडियाला अजिंक्य आघाडी मिळू शकते. तसेच इंग्लंड संघ चौथा सामना जिंकून पुन्हा एकदा मालिकेत स्वतःला कायम ठेवू इच्छितो. आता पुण्याच्या टी20 सामन्याचा निकाल काय लागतो हे पाहणे रंजक ठरेल.
Rajkot ✈️ Pune#TeamIndia have arrived for the 4th #INDvENG T20I 😎@IDFCFIRSTBank pic.twitter.com/gnFfioFWQW
— BCCI (@BCCI) January 29, 2025
मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथे खेळला गेला. ज्यामध्ये टीम इंडियाने 7 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 मध्ये भारताने 2 विकेट्सने विजय मिळवला. यानंतर तिसऱ्या टी20 मध्ये इंग्लंडने 26 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत स्वतःला कायम ठेवले.
उल्लेखनीय म्हणजे, राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी20 मध्ये भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने टीम इंडियामध्ये पुनरागमन केले. दुखापतीतून परतलेल्या शमीने जवळजवळ 14 महिन्यांनंतर टीम इंडियासाठी सामना खेळला. परतल्यानंतर, शमीने त्याच्या पहिल्या सामन्यात 3 षटके टाकली, ज्यामध्ये त्याने 25 धावा दिल्या. मात्र, शमीला एकही विकेट मिळवता आली नाही.
टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल (उपकर्णधार), अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, रिंकू सिंग, शिवम दुबे, रमणदीप सिंग, हर्षित राणा
हेही वाचा-
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी हा भारतीय खेळाडू रणजी सामना खेळणार, फिटनेसवर असणार नजरा
SL VS AUS: स्टीव्ह स्मिथची शतकी खेळी, दिग्गज गावस्करांचा महान विक्रम मोडीत
आयसीसी रँकिंगमध्ये मोठी उलथापालथ, तिलक वर्मा-वरुण चक्रवर्तीला बंपर फायदा!