भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचे तीन कसोटी सामने बाकी आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयने शनिवारी (10 फेब्रुवारी) या तीन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा केली. संघ समोर आल्यानंतर विराट कोहली शेवटच्या तिन्ही कसोटीत खेळणार नाही, हे स्पष्ट होत आहे. रविंद्र जडेजा आणि केएल राहुल यांचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये विराट कोहली वैयक्तिक कारणास्तव खेळला नव्हता. तिसऱ्या कसोटीसाठी माजी कर्णधार संघासोबत जोडला जाईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण विराटने पुन्हा एकदा वैयक्तिक कारण देत शेवटच्या तिन्ही कसोटी सामन्यांमधून माघार घेतली. ही त्याच्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीतील पहिली वेळ आहे, जेव्हा तो अशा प्रकारे संपूर्ण कसोटी मालिकेत खेळला नाहीये.
Virat Kohli will miss an entire series for the first time in his 13 year old Test career. pic.twitter.com/domo84E9JB
— Johns. (@CricCrazyJohns) February 10, 2024
दुसरीकडे केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांनी दुखापतीच्या कारणास्तव दुसऱ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली होती. विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघ राहुल आणि जडेजाच्या अनुपस्थिती खेळला आणि जिंकला. तिसऱ्या कसोटीसाठी या दोघांच्या उपस्थितीबाबत संभ्रम होता. पण शनिवारी संघ जाहीर झाल्यानंतर या दोघांचे संघात कमबॅक झाल्याचे दिसले. दुसरीकडे पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये खेळलेला श्रेयस अय्यर मात्र शेवटच्या तिन्ही कसोटींसाठी उपलब्ध नसेल. दुसऱ्या कसोटी सामन्यांतर अय्यरला पाठीची दुखापत झाली, अशा बातम्या काही दिवसांपासून समोर येत होत्या.
इंग्लंडविरुद्ध शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन अश्विन, रविंद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप
इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने झाले आहेत. आता उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघ आणि इंग्लंड संघ यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळेल. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारी रोजी राजकोट येथे सुरु होईल. त्यानंतर रांचीमध्ये 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंत चौथा कसोटी सामना होईल. तर पाचवा आणि अंतिम कसोटी सामना धरमशाला येथील मैदानावर 07 मार्च रोजी सुरु होईल.
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
U19 Final IND vs AUS : U19 वर्ल्डकप फायनलआधी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराचा रडीचा डाव, म्हणाला, “आम्हाला हे चॅलेंज…
U19 World Cup Final : बुमराहाने दिले गोलंदाजीचे धडे, खतरनाक ‘यॉर्कर’ टाकणारा नमन तिवारी आहे तरी कोण? वाचा सविस्तर…