India vs England Test series रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या बातमीने सर्व क्रिकेटप्रेमींना धक्का बसला. (Rohit Sharma retirement) यानंतर, निवडकर्त्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे की भारतीय संघात कसोटी संघाची जबाबदारी कोण घेणार? यासोबतच, रोहित शर्माच्या जागी कसोटीत कोण सलामीला येईल? असा प्रश्नही उपस्थित होतो. भारताकडून खेळताना याआधी रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल सलामीवीर फलंदाज म्हणून येत होते, परंतु रोहितच्या निवृत्तीनंतर ही जागा एखाद्या तरुण खेळाडूला दिली जाऊ शकते. (Test captain replacement India)
इंग्लंड दौऱ्यासाठी जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाची अद्याप घोषणा झालेली नाही. यासोबतच, क्रिकेट चाहते नवीन कसोटी कर्णधाराच्या नावाचीही वाट पाहत आहेत. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर साई सुदर्शनची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड होऊ शकते. साई सुदर्शन आयपीएलमध्येही चमकदार कामगिरी करत आहे. (Sai Sudarshan Test debut) सुदर्शनने 13 सामन्यांमध्ये 638 धावा केल्या आहेत. तो या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
या यादीत अभिमन्यू ईश्वरनचेही नाव आहे. अभिमन्यूची अनेक वेळा इंडिया अ-टीमसाठी निवड झाली आहे. रोहित शर्माच्या जागी अभिमन्यू ईश्वरन इंग्लंड दौऱ्यावर भारताच्या वरिष्ठ संघात पदार्पण करू शकतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. तर केएल राहुल मधल्या फळीत फलंदाजी करू शकतो. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर काही दिवसांनीच विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, त्यानंतर आता भारताच्या कसोटी संघात मोठा बदल दिसून येणार आहे. (BCCI press conference) बीसीसीआय आज नव्या कर्णधाराची घोषणा करणार आहे. ज्यासाठी दुपारी 1.30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये इंग्लंड दाैऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर होणार आहे. (India Test squad announcement)





