भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका सध्या सुरू आहे. उभय संघांतील कसोटी मालिका पाच सामन्यांची असून पहिले दोन सामने खेळले गेले आहे. मालिका 1-1 अशा बरोबरीवर असताना भारतीय संघासाठी अजून एक डोकेदुखी समोर येत आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू होण्याआधी भारताला महत्वाचा खेळाडू संघातून बाहेर होण्याची पूर्ण शक्यता आहे. याविषयी फक्त अधिकृत घोषणा होणेच बाकी आहे.
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पहिला कसोटी सामना पाहुण्या इंग्लंडने, तर दुसरा सामना यजमान भारताने जिंकला. 15 फेब्रुवारी रोजी उभय संघांतील तिसरा सामना राजकोटमध्ये सुरू होईल. विराट कोहली (Virat Kohli) वैयक्तिक कारणास्तव भारतीय संघातून सध्या बाहेर आहे. तसेच रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आण केएल राहुल (KL Rahul) यांनी दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली होती. भारतीय संघाला शेवटच्या तीन कसोटींसाठी आपला संघ घोषित करावा लागणार आहे. अशातच श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्या दुखापतीची बातमी समोर येत आहे. सराव करताना अय्यरच्या पाठीत तान आणि ग्रोईन दुखावल्याचे समोर येत आहे. याच कराणास्तव केवळ तिसऱ्या कसोटीतून नाही, तर संपूर्ण कसोटी मालिकेला अय्यर मुकू शकतो.
Shreyas Iyer is likely to miss the last 3 Tests against England due to Stiff back & groin pain. [Express Sports] pic.twitter.com/J090zNXwoC
— Johns. (@CricCrazyJohns) February 9, 2024
माध्यमांतील वृत्तांनुसार विशाखापट्टणम कसोटी संपल्यानंतर सर्व खेळाडूंचे क्रिकेट कीट राजकोटला पोहोचले. पण एकट्या अय्यरचे क्रिकेट कीट राजकोट ऐवजी मुंबईला पाठवण्यात आले. त्याच्या दुखापतीमुळेच तिसऱ्या कसोटीआधी भारतीय संघाची घोषणा रखडली आहे. पण लवकरच संघ घोषित केला जाईल.
सूत्रांच्या माहितीनुसार अय्यरला बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवले जाऊ शकते. ही दुखापत गंभीर असेल तर तो इंग्लंडविरुद्ध राहिलेल्या तिन्ही कसोटी सामन्यांना मुकू शकतो. असे असले तरी, इंडियन प्रीमियर लीग 2024 मधून फलंदाजाचे संघातील पुनरागमन निश्चत असेल. दरम्यान, अय्यर मागच्या वर्षी देखील पाठिच्या दुखापतीमुळे मोठा काळ संघातून बाहेर राहिला. मागच्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आशिया चषकासाठी संघात पुनरागमन केले होते. (IND vs ENG Test Series Shreyas Iyer is likely to miss the last 3 Tests against England)
महत्वाच्या बातम्या –
Video : अबब..! वय फक्त आकडा, पहा आफ्रिकेच्या 44 वर्षाच्या दिग्गज खेळाडूचा कडक कॅच
U19 World Cup Final: ठरलं! वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पुन्हां एकदा भारत ऑस्ट्रलिया वर्ल्डकप फायनल सामना…