---Advertisement---

IND Vs ENG : यशस्वी जयस्वालची मोठी कामगिरी, सर डॉन ब्रॅडमनच्या क्लबमध्ये झाला समावेश

On: शनिवार, फेब्रुवारी 24, 2024 8:00 PM
---Advertisement---

भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने रांची कसोटीत 73 धावांची खेळी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र बशीर आणि टॉम हार्टली यांनी भारताच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले आहे. तसेच भारताची अवस्था 7 बाद 177 धावा अशी झाली होती. दरम्यान, यशस्वी जयस्वालने आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान अनेक विक्रम त्याने नावावर केले आहेत. याबरोबरच यशस्वी जयस्वाल आता इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

याबरोबरच,यशस्वी जयस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली असून यशस्वी जयस्वाल आता माजी महान ऑस्ट्रेलियन फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या खास क्लबमध्ये देखील सामील झाली आहे. तसेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वी जयस्वालची बॅट जोरदार चालत आहे. अशातच  यशस्वी जयस्वालने या कसोटी मालिकेत आतापर्यंत 618 धावा केल्या आहेत. यासह जयस्वाल आता सर डॉन ब्रॅडमन, सर गारफिल्ड सोबर्स, सुनील गावस्कर, ग्रॅमी स्मिथ आणि जॉर्ज हॅडली आणि नील हार्वे यांच्यासोबत 23 वर्षापूर्वी कसोटी मालिकेत 600 हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे.

वयाच्या 23 वर्षापर्यत कसोटी मालिकेत 600 पेक्षा जास्त धावा करणारे फलंदाज

1. डॉन ब्रॅडमन विरुद्ध इंग्लंड, वर्ष 1930 (974 धावा)

2. गॅरी सोबर्स विरुद्ध पाकिस्तान 1957-58 (824 धावा)

3. सुनील गावस्कर विरुद्ध वेस्ट इंडिज 1970-71 (774 धावा)

4. ग्रॅम स्मिथ विरुद्ध इंग्लंड 2003 (714 धावा)

5. जॉर्ज हॅडली विरुद्ध इंग्लंड 1929-30 (703 धावा)

6. नील हार्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका 1949-50 (660 धावा)

7. यशस्वी जयस्वाल विरुद्ध इंग्लंड 2024 (618* धावा)

दरम्यान, रांची कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी 7 विकेट गमावून 219 धावा केल्या आहेत. त्यामुळे रांची कसोटी सामन्यात भारतीय संघावर इंग्लंड संघाचा वरचष्मा दिसत आहे. भारतीय संघ अजूनही इंग्लंडपेक्षा 134 धावांनी मागे आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---