बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटीतील दुसऱ्या सामन्यात जशी सुरुवात ऑस्ट्रेलियाची झाली, त्याहून खराब सुरुवात भारतीय संघाची झाली. भारताने झटपट विकेट्स गमावल्या. दिल्ली कसोटीत भारतीय संघ संघर्ष करताना दिसत आहे. भारताने दुसऱ्या सत्रात 48 षटकानंतर 5 विकेट्स गमावत 126 धावा केल्या. यावेळी विराट कोहली 37 धावांवर खेळत होता. विराटला साथ देण्यासाठी मैदानावर केएस भरत आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा केल्या. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवशी भारतीय सलामीवीर फलंदाज केएल राहुल अवघ्या 17 धावांवर तंबूत परतला. त्याला फिरकीपटू नेथन लायन याने बाद केले.
केएल राहुल (KL Rahul) याला या चालू मालिकेत एकदाही मोठी धावसंख्या उभारता आली नाहीये. त्याने पहिल्या कसोटीत फक्त 20 धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात भारतीय संघाने फलंदाजी केली नव्हती. राहुल हा भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. 30 वर्षीय राहुलच्या शेवटच्या 9 डावांविषयी बोलायचं झालं, तर त्याने कोणत्याच डावात 30 धावांचा आकडा पार केला नाहीये. अशात त्याला संघाबाहेर जावे लागू शकते. लवकरच अंतिम 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा होणे बाकी आहे. सुरुवातीला मालिकेतील फक्त पहिल्या दोन कसोटीसाठीच संघाची घोषणा झाली होती.
Nathan Lyon gives Australia the breakthrough as KL Rahul departs for 17.#WTC23 | #INDvAUS | 📝 https://t.co/HS93GIyEwS pic.twitter.com/JoIIEEf0ab
— ICC (@ICC) February 18, 2023
केएल राहुल फ्लॉप
राहुल याच्या शेवटच्या 9 कसोटी डावांबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 8, 12, 10, 22, 23, 10, 2, 20 आणि 17 धावा केल्या आहेत. त्याची यादरम्यानची सर्वोत्तम धावसंख्या ही 23 इतकी आहे. यादरम्यान तो दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया संघांविरुद्ध वाईटरीत्या अपयशी ठरला आहे.
शुबमन गिल चांगल्या लयीत
भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) हा सध्या चांगल्या लयीत आहे. मागील काही दिवसांपूर्वी त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत द्विशतक आणि टी20त आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. त्याने मागील वर्षीच्या अखेरीस बांगलादेशविरुद्ध कसोटी शतकही केले होते. त्यामुळे भारतीय संघाला कसोटी मालिका जिंकण्यात यश आले होते.
केएल राहुल याने चालू मालिकेतील दोन्ही डावांमध्ये फिरकीपटूंविरुद्ध विकेट गमावली आहे. पहिल्या कसोटीत त्याला फिरकीपटू टॉड मर्फी याने, तर दुसऱ्या कसोटीत नेथन लायन याने बाद केले. भारतीय संघ 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0ने आघाडीवर आहे. नागपूर कसोटीत भारताने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला होता. (ind vs ind 2nd test opener kl rahul not reach 30 runs in any of last 9 innings of the test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला खरंच भासतेय रिषभ पंतची गरज! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ‘या’ विक्रमात टॉपर आहे पठ्ठ्या
चुकलास राव! 100व्या कसोटीत पुजारा शून्यावर बाद, लायनविरुद्ध खेळताना नकोशा विक्रमात बनला टॉपर