Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अश्विनचा नादच खुळा! ऑस्ट्रेलियाच्या 3 विकेट्स घेताच नावावर मोठ्या विक्रमाची नोंद, बनला दुसराच भारतीय

अश्विनचा नादच खुळा! ऑस्ट्रेलियाच्या 3 विकेट्स घेताच नावावर मोठ्या विक्रमाची नोंद, बनला दुसराच भारतीय

February 17, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
R-Ashwin

Photo Courtesy: bcci.tv


भारतीय संघाचे खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्ली येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विक्रम रचताना दिसत आहेत. चेतेश्वर पुजारा याने 100 कसोटी सामने खेळण्याचा इतिहास रचला. यानंतर आता भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन यानेदेखील ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध भीमपराक्रम गाजवला आहे. काय आहे अश्विनचा विक्रम? चला सविस्तर जाणून घेऊया.

डावाच्या 53 षटकानंतर अश्विनच्या 3 विकेट्स
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील (Border-Gavaskar Trophy) दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) आमने-सामने आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात भारताकडून गोलंदाजी करताना 53 षटकांनंतर आर अश्विन (R Ashwin) याने एकूण 3 विकेट्स चटकावल्या. त्यामध्ये त्याने 23वे षटक टाकताना चौथ्या चेंडूवर मार्नस लॅब्युशेन (Marnus Labuschagne) याला बाद केले. त्यानंतर त्याच षटकातील सहाव्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याला शून्य धावेवर तंबूत धाडले. अश्विनने तिसऱ्या विकेटच्या रूपात ऍलेक्स कॅरे यालाही शून्य धावेवर विराट कोहलीकडून झेलबाद करत फसवले.

अश्विनचा विक्रम
या तीन विकेट्स घेताच अश्विनच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. अश्विन हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज बनला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला. या यादीत अव्वलस्थानी अनिल कुंबळे (Anil Kumble) आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 111 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर यादीत तिसऱ्या स्थानी हरभजन सिंग (Harbhajan Singh) असून त्याने 95 विकेट्स घेतल्या आहेत. यादीत चौथ्या स्थानी कपिल देव (Kapil Dev) असून त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 79 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.

Another day at office and another milestone for @ashwinravi99 👏👏

Do you reckon Australia is his favourite opponent?#INDvAUS pic.twitter.com/Oxohqv9HQi

— BCCI (@BCCI) February 17, 2023

यानंतर यादीत रवींद्र जडेजा याच्या नावाचाही समावेश आहे. जडेजान दुसऱ्या कसोटीत एक विकेट नावावर करत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 71 विकेट्स घेण्याचा मान मिळवला. (Indian bowlers who took most wickets against Australia R Ashwin in the 2nd list)

ऑस्ट्रेलिविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज
111- अनिल कुंबळे
100- आर अश्विन*
95- हरभजन सिंग
79- कपिल देव
70- आर जडेजा

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाणेफेकीचा कौल जिंकत ऑस्ट्रेलिया करणार बॅटिंग, टीम इंडियात ‘या’ पठ्ठ्याचे पुनरागमन
रिटायर होऊन 5 वर्षे लोटली, पण डिविलियर्सचा ‘हा’ सर्वात खतरनाक विश्वविक्रम आजही अबाधित; जाणून घ्याच


Next Post
Ravi Ashwin vs Steve Smith

स्टीव स्मिथ पुन्हा बनला अश्विनची शिकार, कसोटीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' प्रकार

Ravindra-Jadeja

जडेजा चमकला रे! ऑस्ट्रेलियाचा डाव सावरणाऱ्या ख्वाजाची विकेट घेताच बनला विक्रमवीर

Photo Courtesy:Twitter/BCCI

याला म्हणतात फिटनेस! राहुलने टिपलेल्या 'लाजवाब' कॅचने ख्वाजा तंबूत, पाहा व्हिडिओ

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143