---Advertisement---

एवढं सगळ करूनही संजू सॅमसनवर भारतीय दिग्गज नाराजच! वाचा काय म्हणतोय

On: बुधवार, जून 29, 2022 1:27 PM
Sanju-Samson-Upset
---Advertisement---

भारतीय संघाने आयर्लंड संघाला टी-२० मालिके क्लीन स्वीप (२-०) दिला. मालिकेती दुसरा सामना मंगळवारी (२८ जून) खेळला गेला असून भारताने ४ धावांनी हा जिंकला. संजू सॅमसन आणि दीपक हुड्डाने भारतासाठी सर्वोत्तम प्रदर्शन केले. सॅमसनने या सामन्यात त्याचे पहिले टी-२० अर्धशतक पूर्ण केले. परंतु भारतीय संघाचे माजी खेळाडू अजय जडेजा सॅमसनच्या या अप्रतिम प्रदर्शनानंतर देखील खुश नाहीत.

हार्दिक पंड्याने या सामन्यान नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर हार्दिकने माहिती दिली की, संजू सॅमसन (Sanju Samson) प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल. हार्दिकने ही माहिती देताच प्रेक्षकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. सॅमसन देखील कर्णधार आणि प्रेक्षकांच्या अपेक्षांवर पात्र ठरला. त्याने ४२ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या. सलामीवर इशान किशन ३ धावा करून बाद झाल्यानंतर सॅमसन आणि दीपक हुड्डाने संघाला चांगली सुरुवात दिली. सॅमसनच्या टी-२० कारकिर्दीतील हे पहिले अर्धशतक होते, तर हुड्डानेही आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पहिले शतक ठोकले.

सॅमसनच्या या खेळीनंतर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक अजय जडेजा (Ajay Jadeja) मात्र समाधानी नव्हते. त्यांच्या मते सॅमसन देखील हुड्डाप्रमाणे शतक करू शकत होता. ते  म्हणाले की, “सॅमसनने देखील शतक पूर्ण केले पाहिजे होते. मी आणि ग्रीम स्वान तुझे मोठे चाहते आहोत, पण तू शतक पूर्ण करू शकला नाही, त्यामुळे आम्हाला खूप दुःख आहे. मला वाटते की, तुला देखील असेचे वाटत असावे.”

सॅमसनने देखील जडेजाच्या या वक्तव्याला सहमती दर्शवली. तो म्हणाला की, तो पुढे स्वतःला अधिक उत्तम बनवण्याचा प्रयत्न करतील. “धन्यवाद अजय भाई. मी पुढच्या सामन्यात जास्त धावा करण्याचा प्रयत्न करेल,” अशी प्रतिक्रिया सॅमसनने दिली. दरम्यान, दीपक हुड्डा त्याच्या शतकाच्या जोरावर सामनावीर ठरला. त्याने अवघ्या ५७ चेंडूत १०४ धावा केल्या. भारताने दिलेल्या २२६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचे खेळाडू देखील उत्कृष्ट खेळले. त्यांना शेवटच्या चेंडूवर ५ धावांची गरज होती, परंतु स्ट्राईकवरील फलंदाज षटकार मारू शकला नाही आणि त्यांचा संघ पराभूत झाला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

दीपक हुड्डा आणि संजू सॅमसनच्या वादळाने उध्वस्त केले सारेच विक्रम, नावावर केला टी२०तील वर्ल्ड रेकॉर्ड

अफलातून! आजवर ११ हजार टी२० खेळल्या गेल्या, पण ‘ही’ अद्भुत कामगिरी करणारा भारतीय संघ पहिलाच

एकमेवाद्वितीय! आजच्याच दिवशी १५ वर्षांपूर्वी सचिन ठरला होता ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेव क्रिकेटपटू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---