भारतीय संघाला रविवारी (२६ जून) आयर्लंडविरुद्धचा पहिला टी-२० सामना खेळायचा आहे. उभय संघातील या दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेत हार्दिक पंड्या भारताचे नेतृत्व करत आहे, तर संघात संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव यांचे पुनरागमन झाले आहे. रोहित शर्मा, विराट कहोली या दिग्गजांसह वरिष्ठ खेळाडूंचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. आयर्लंडविरुद्धचा पहिला सामना डबलिनमध्ये खेळला जाणार असून भारतीय खेळाडू या सामन्यात काही महत्वाचे विक्रम बनवू शकतात.
आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात बनू शकतात हे विक्रम –
१. सलामीवीर फलंदाज इशान किशनला टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये स्वतःच्या ५०० धावा पूर्ण करण्यासाठी अजून ५ धावांची आवश्यकता आहे.
२. राहुल त्रिपाठी टी-२० क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण करू शकतो. ही कामगिरी करण्यासाठी त्याला अजून ३ षटकारांची गरज आहे.
३. अष्टपैलू अक्षर पटेल टी-२० क्रिकेटमध्ये स्वतःच्या २००० धावा पूर्ण करू शकतो. यासाठी त्याचा अजून ५० धावांची आवश्यकता आहे.
४. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० धावा पूर्ण करण्यासाठी दिनेश कार्तिकला अजून ९ धावांची गरज आहे. कार्तिक नक्कीच या सामन्यात ही कामगिरी पार पाडेल.
५. अष्टपैलू हार्दिक पंड्याला टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ५० चौकार पूर्ण करण्यासाठी अजून ६ चौकारांची गरज आहे, जे या सामन्यात पूर्ण होऊ शकतात.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत इशान किशनने भारताला चांगली सुरुवात करून दिली होती. अशात आयर्लंडविरुद्धही इशानच भारताच्या डावाची सुरुवात करताना दिसेल. सलामीवीर ऋतुराज गायकवाडवर मात्र काही प्रमाणात दबाव असेल. कारण दक्षिण आफ्रिकी संघाविरुद्ध त्याला अपेक्षित प्रदर्शन करता आले नव्हते. उमरान मिलक आणि अर्शदीप सिंग या वेगवान गोलंदाजांना देखील या मालिकेत आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत देखील त्यांना संघात निवडले होते, पण पदार्पणाची संधी मात्र मिळाली नव्हती.
आयर्लंडविरुद्ध भारताने आतापर्यंत तीन टी-२० सामने खेळले आहेत आणि सर्वच्या सर्व जिंकले देखील आहेत. आगामी मालिदेत देखील भारत आयर्लंडला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्नात असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बुमराह असेल भारताचा नवा कर्णधार, कपिल देवने रचलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी
फुटबॉल अन् बरंच काही, आयर्लंडशी दोन हात करण्यापूर्वी टीम इंडियाची मस्ती
गडी लय तापलाय! पंचांच्या चुकीच्या निर्णयाविरोधात पृथ्वी शॉने घातला राडा, पाहा व्हिडिओ