---Advertisement---

भारताची धावसंख्या 300 पार नेण्यासाठी झगडत होता सॅमसन, पण फिलिप्सने ‘असा’ लावला ब्रेक; व्हिडिओ व्हायरल

On: शुक्रवार, नोव्हेंबर 25, 2022 5:08 PM
Sanju-Samson-And-Glenn-Phillips
---Advertisement---

भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्यातील टी20 मालिका 1-0ने आपल्या नावावर केली. यानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडच्या हातून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने हा सामना 7 विकेट्स राखत जिंकला. यासोबतच मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. असे असले, तरीही या सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज ग्लेन फिलिप्सने झेल घेतलेला व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा झेल घेत त्याने संजू सॅमसन याला तंबूचा रस्ता दाखवला.

भारतीय संघाचा डाव
या सामन्यात नाणफेक जिंकत केन विलियम्सन (Kane Williamson) याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 50 षटकात 306 धावा चोपल्या. यादरम्यान संजू सॅमसन (Sanju Samson) हा 36 धावाच करू शकला. तो अधिक धावा करू शकला असता, पण त्याच्या खेळीचा शेवट ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) याने घेतलेल्या झेलाने झाला.

ग्लेन फिलिप्सचा झेल
न्यूझीलंड संघाचा विस्फोटक खेळाडू ग्लेन फिलिप्स याने या सामन्यात जबरदस्त क्षेत्ररक्षण करत सॅमसनचा झेल घेतला. सॅमसन त्यावेळी क्रीझवर राहून वेगाने धावसंख्या 300 धावांच्या पार करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने 45व्या षटकात ऍडम मिल्ने याच्या चेंडूवर जोरदार फटका मारला. मात्र, योग्य वेळी चेंडू बॅटवर न आल्याने चेंडू हवेत गेला. त्यानंतर फिलिप्सने डीप मिडविकेटवर धावत जाऊन हा झेल घेतला.

यावेळी सॅमसनने 38 चेंडूत 4 चौकारही मारले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर याने एक अविश्वसनीय खेळी साकारली. त्याने 16 चेंडूत नाबाद 37 धावा चोपल्या. तसेच, कर्णधार शिखर धवनने 72 धावा, शुबमन गिलने 50 धावा आणि श्रेयस अय्यर याने 80 धावांची खेळी साकारली. मात्र, रिषभ पंत आणि सूर्यकुमार यादव यांना फार चांगली खेळ दाखवता आला नाही.

दुसरीकडे, न्यूझीलंडच्या डावात गोलंदाजी करताना भारताकडून पहिला वनडे सामना खेळणाऱ्या उमरान मलिक (Umran Malik) याने दोन विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याने 10 षटकात 66 धावा खर्च केल्या होत्या. तसेच, शार्दुल ठाकूर यानेही 9 षटकात 63 धावा देत 1 विकेट घेतली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! पहिल्या वनडेत धावांचा पाऊस, किवींकडून भारताचा धक्कादायक पराभव, फलंदाजांनी कमावलं पण गोलंदाजांनी गमावलं

दिग्गज इंग्लिश क्रिकेटपटू बनला बाप, लग्नाआधीच चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---