---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिकेपूर्वी कोच गंभीरने उचललं मोठं पाऊल, पाहा नेमकं काय घडलं?

On: बुधवार, जानेवारी 21, 2026 7:21 AM
---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पराभव विसरून टीम इंडिया आता नव्या आव्हानासाठी पूर्णपणे तयार झाली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आता पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार असून, ही मालिका भारतासाठी 2026 मधील पहिली तर आगामी टी-20 वर्ल्ड कपपूर्वीची शेवटची मोठी कसोटी आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

या मालिकेतील पहिला सामना आज बुधवारी, 21 जानेवारी रोजी रंगणार आहे. हा सामना नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार असून, संध्याकाळी 6.30 वाजता नाणेफेक पार पडेल.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी-20 सामना प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील विविध चॅनेल्सवर थेट पाहता येणार आहे. तसेच मोबाईल आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा सामना जिओहॉटस्टार APPवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहता येईल.

टी-20 मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. तर न्यूझीलंड संघाची धुरा मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. नववर्षातील पहिल्याच टी-20 सामन्यात भारत विजयी सुरुवात करतो की किवी संघ पुन्हा एकदा भारतावर मात करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

या सामन्याबाबत आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विकेटकीपर फलंदाज ईशान किशन पहिल्या टी-20 सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार, हे कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पष्ट केलं आहे. दुखापतीमुळे तिलक वर्मा पहिल्या तीन टी-20 सामन्यांना मुकणार असून, त्याच्या जागी ईशान किशनला संधी देण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---