IND VS NZ; भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी भारतीय संघाची कामगिरी समाधानकारक राहिली. पहिल्या डावात सपेशल अपयशी ठरलेल्या भारतीय संघाने न्यूझीलंडच्या फलंदाजांना पहिल्या डावात 402 धावांवर रोखले. परिणामी पाहुण्या संघाने सामन्यात 356 धावांची मोठी आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 49 षटकात 231/3 धावा केल्या.
पहिल्या डावात टीम इंडिया 46 धावात बाद झाल्यानंतर संघावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आले होते. त्यानंतर भारतीय गोलंदाजींनी न्यूझीलंडला दुसऱ्या डावात 402 धावांवर रोखले. ज्यामध्ये पाहुण्यासंघाकडून रचिन रवींद्रने सर्वाधिक 134 धावा केल्या. तर गोलंदाजीत कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या डावात भारतीय संघाने शानदार कमबॅक केले. पहिल्या जोडीसाठी रोहित शर्मा आणि जयस्वालने 72 धावांची ताबडतोड भागीदारी केली. पण डावाच्या 18 व्या षटकात एजाज पटेलने यशस्वी जयस्वालला बाद केले.जयस्वाल 35 धावा करुन परतला. तर कर्णधार रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. मात्र 50+ धावा केल्यानंतर तो बाद झाला. एकेकाळी 95-2 अशी धावसंख्या असाताना तिसऱ्या आणि चाैथ्या क्रमांकावर आलेल्या विराट कोहली आणि सर्फराज खान यांनी संघाला सावरले. ज्यामध्ये दोघांनी अर्धशतकी खेळी खेळली. पण दिवसाखेर शेवटच्या चेंडूवर विराट कोहली 70 धावांवर बाद झाला. तर 70 धावा करुन सर्फराज खान नाबाद आहे. एकूणच भारत तिसऱ्या दिवसाखेर 49 षटकात तीन गडी गमावून 231 धावांवर आहे. टीम इंडिया आणखी 125 धावांनी पिछाडीवर आहे.
विराट कोहलीची ही खेळी संघासोबत वैयक्तिकरित्या देखील म्हत्तवाची ठरली. त्याने अर्धशतक करताच कसोटी करिकीर्दीत मोठी कामगिरी केली. वास्तविक विराट कोहलीने 9000 कसोटी धावांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा चाैथा फलंदाज ठरला आहे. त्याचे पुढे सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, आणि सुनिल गावस्कर या दिग्गजांचा समावेश आहे.
हेही वाचा-
कोहलीची ‘विराट’ कामगिरी, सचिन-द्रविड आणि गावस्कर यांच्या खास क्लबमध्ये प्रवेश
IND vs NZ: दुर्दैवीचं म्हणावं..! रोहित शर्माची अनलकी विकेट; पाहा VIDEO
विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला का आला? कर्णधारानं सांगितलं कारण