भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना खेळला गेला. या कसोटी मालिकेत पाहुण्या न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला 3-0 असे एकतर्फी पराभूत केले. तत्पूर्वी, तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या फलंदाजीत बरेच बदल पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान रिषभ पंतची विकेट पडल्यानंतर सर्फराज खानच्या जागी रवींद्र जडेजाला फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. उजवे-डावे संयोजन कायम ठेवण्यासाठी संघाने हे पाऊल उचलल्याचे मानले जात होते. मात्र, माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांना ही रणनीती अजिबात समजली नाही.
संजय मांजरेकर यांनी सर्फराज खानचा सध्याचा फॉर्म लक्षात घेता त्याच्या फलंदाजी क्रमवारीतील हा बदल हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, सर्फराज सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून पहिल्या कसोटीत त्याने 150 धावा केल्या होत्या. मांजरेकर म्हणाले की, ‘त्याने मागील तीन सामन्यात तीन अर्धशतके आणि बेंगलोर कसोटीत 165 धावा केल्या होत्या. सर्फराज हा फिरकी गोलंदाजीविरुद्ध कुशल फलंदाज मानला जातो, त्यामुळे त्याला आठव्या क्रमांकावर पाठवणे हा विचित्र आणि अनावश्यक निर्णय आहे.’
A guy in form, has 3 fifties in his first 3 Tests, gets 150 in the Bangalore Test, a good player of spin, pushed back in the order to keep left & right combination?? Makes no sense. Sarfraz now walking in at no 8! Poor call by India.
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) November 2, 2024
फलंदाजीतील या बदलानंतर सर्फराज खान पहिल्या डावात एकही धाव न काढता बाद झाला. न्यूझीलंडचा गोलंदाज एजाज पटेलच्या चेंडूवर चुकीचा फटका खेळल्यामुळे सर्फराजने चार चेंडूंतच आपली विकेट गमावली. त्यानंतर दुसऱ्या डावातही सर्फराज अपयशी ठरला. भारतीय संघाला गरज असताना तो केवळ एक धाव काढून, मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाला.
भारतीय संघासाठी या मालिकेत शतक ठोकणारा सर्फराज एकमेव फलंदाज ठरला. त्याने बेंगलोर कसोटीत 165 धावांची खेळी केली होती. मात्र, पुढील दोन कसोटीत तो आपली कामगिरी उंचावू शकला नाही. त्यामुळे त्याच्या आणि मग खेळीच्या शैलीवर प्रश्नचिन्ह झाले. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याचा भारतीय संघात समावेश असून, तिथे तो कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
“माझे आणि माझ्या कुटुंबाचे…”, राजस्थान रॉयल्सने रिलीज केल्यानंतर बटलरची भावनिक पोस्ट
रोहित आणि विराटने निवृत्त व्हावे; न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर नेटकऱ्यांनी केले ट्रोल
वानखेडे कसोटीतील पराभवानंतर रोहितच्या नेतृत्त्वावर ‘डाग’, न्यूझीलंडने विक्रमांचा रचला ढीग