---Advertisement---

न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यासाठी अशी असू शकते ११ जणांची टीम इंडिया

---Advertisement---

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर (India tour of New Zealand) आहे. या दौऱ्याची सुरूवात भारतीय संघ उद्यापासून(24 जानेवारी) टी20 मालिकेने करणार आहे. यामालिकेत 5 टी20 सामन्यांचा (5 T20 matches ) समावेश असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या (24 जानेवारी) ऑकलँड (Auckland) येथे पार पडणार आहे.

उद्या होणाऱ्या पहिल्या टी20 सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) हे दोन खेळाडू सलामीला फलंदाजी करण्याची शक्यता आहे. रोहित मागील अनेक वर्षापासून सलमीला चांगली फलंदाजी करत आहे. तसेच त्याने नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) झालेल्या वनडे मालिकेतील एका सामन्यात सलामीला फलंदाजी करताना शतकी खेळी केली होती.

त्याचबरोबर शिखर धवन दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर पडल्याने त्याच्याऐवजी राहुलच रोहित बरोबर सलामीला उतरण्याची शक्यता आहे. त्याने मागील अनेक दिवसांपासून विविध क्रमांकावर खेळताना चांगली कामगिरी केली.

त्याचबरोबर या टी20 मालिकेत मधल्या फळीत भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची शक्यता आहे.

भारताचा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हा या मालिकेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरु शकतो. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी करता आली नव्हती. परंतु आता न्यूझीलंड दौऱ्यात या टी20 मालिकेत त्याला मधल्या फळीत चांगली कामगिरी करण्याची संधी आहे.

तसेच मधल्या फळीत फलंदाजीसाठी मनीष पांडेलाही (Manish Pandey) संधी मिऴण्याची शक्यता आहे.

या टी20 मालिकेसाठी भारताकडे 3 अष्टपैलू क्रिकेटपटू आहेत. त्यामध्ये शिवम दुबे (Shivam Dube), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sunder) या खेळाडूंचा समावेश आहे. परंतु या अष्टपैलू क्रिकेटपटूंपैकी भारतीय संघ व्यवस्थापन 2 खेळाडूंना अंतिम 11 जणांच्या संघात संधी देण्याची शक्यता आहे.

तसेच फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवला पसंती मिळू शकते. त्याचबरोबर मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे वेगवान गोलंदाज अंतिम 11 जणांच्या संघात असतील.

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी20 सामन्यासाठी असा असू शकतो भारतीय संघ-

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, जसप्रीत बुमराह, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---