माऊंट मॉनगनुई| बे ओव्हल मैदानावर भारतीय महिला संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला संघ असा दुसरा वन-डे सामना आज (29 जानेवारी) पार पडला. यामध्ये भारताने 8 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांच्या वन-डे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे.
या सामन्यात न्यूझीलंडच्या महिलांनी भारतीय महिला संघासमोर प्रथम फलंदाजी करताना 162 धावांचे आव्हान ठेवले होते. या लक्षाचा पाठलाग करताना भारताची सलामीवीर जेमिमा रोड्रीगेज शुन्यावर बाद झाली असता स्मृती मंधाना आणि कर्णधार मिताली राज या दोघींनी धडाकेबाज फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
यावेळी स्मृती आणि मिताली यांनी तिसऱ्या विकेटसाठी 151 धावांची सामना विजयी भागीदारी रचली. यामध्ये स्मृतीने 13 चौकार आणि 1 षटकारसह 82 चेंडूत नाबाद 90 धावांची खेळी केली. तर मितालीने 4 चौकार आणि 2 षटकारासह 111 चेंडूमध्ये 63 धावा केल्या आहेत.
स्मृतीने मागील सामन्यातही उत्तम फलंदाजी करत शतक ठोकले होते. आतापर्यंत तिने मागील 10 पैकी 8 सामन्यात 50 किंवा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यातील खेळीमुळे तिला सामनावीराचा पुरस्करही मिळाला आहे.
या सामन्यात भारताच्या फलंदाजाबरोबरच गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवत न्यूझीलंडच्या फंलदाजांना धावा करण्यापासून रोखले.
भारताकडून झुलन गोस्वामीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर एकता बिश्त, दिप्ती शर्मा आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तसेच शिखा पांडेने एक विकेट घेतली. यामुळे न्यूझीलंडचा डाव 44.2 षटकात 161 धावांवरच संपुष्टात आला.
Player of the Match – Smriti Mandhana! 👏
No surprises there. She starred with an unbeaten 83-ball 90, which comprised 13 fours and a six.#NZvIND pic.twitter.com/5cYNoXCFVw
— ICC (@ICC) January 29, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
–आयसीसी महिला टी२० विश्वचषक२०२० च्या वेळापत्रकाची घोषणा
–हिटमॅन रोहित शर्मा आणि मिताली राजबरोबर घडणार खास योगायोग
–कर्णधार कोहलीने ६३ वन-डेत नेतृत्व करताना केला हा मोठा पराक्रम