न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटी सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला केवळ 147 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात केवळ 174 धावांत गडगडला. त्यामुळे भारतीय संघाला मोठे लक्ष्य मिळालेले नाही. आता टीम इंडियाने हा सामना जिंकला तर 1-2 ने मालिका गमवावी लागेल. न्यूझीलंडने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी घेतली होती. मात्र, या विजयामुळे टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील मार्ग थोडा सोपा होईल असे वाटत असताना भारतीय संघ आता अडचणीत सापडला आहे.
धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची निराशाजनक सुरुवात झाली आहे. भारतीय संघाची त्रिमुर्ती स्वस्तात बाद झाली. कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहली यांच्याकडून निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. रोहित शर्माने 11 तर विराट आणि गिल यांनी केवळ 1 धाव करुन परतले. झटपट विकेट्स गेल्याने टीम इंडिया अडचणीत आली आहे.
दरम्यान आता खेळपट्टीवर रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल नाबाद आहेत. या बातमीखेरीस भारतीय संघ 28-3 अश्या स्थितीत आहे. डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीच्या उद्देशातून खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाकडून खूपच निराशाजनक कामगिरी पाहायला मिळत आहे.
हेही वाचा-
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे संघ (टाॅप-5)
‘लक्ष्य गाठण्यासाठी चांगली फलंदाजी…’; अश्विनने कबूल केले की धावांचा पाठलाग करणे सोपे नाही!
टीम इंडियाला मोठा धक्का, ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरुवातीलाच भारत अ संघाचा पराभव