---Advertisement---

IND vs NZ: अंतिम टी20 सामना किती वाजता होणार? वेळ नोंद करुन ठेवा

On: शुक्रवार, जानेवारी 30, 2026 8:44 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 मालिकेचा अंतिम, पाचवा सामना 31 जानेवारीला तिरुवनंतपुरमच्या मैदानावर खेळला जाणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांपैकी भारताने तीन सामन्यात विजय मिळवला आहे, तर न्यूझीलंडने एक सामना जिंकला. मालिका आधीच भारतीय संघाच्या खिशात असल्याने अंतिम सामन्यात काही प्रयोग करण्याची संधी संघाला मिळेल.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये उतरण्यापूर्वी अंतिम आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. उद्या (31 जानेवारी) सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल, तर टॉस 6.30 च्या सुमारास होईल. अंदाजे संध्याकाळी 10:30 वाजताच्या सुमारास सामना पूर्ण होईल.

सर्वांच्या लक्षात असेल, की या सामन्यात विशेष लक्ष संजू सॅमसनवर असेल. सातत्याने धाव मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेला सॅमसन या सामन्यात आपल्या होम ग्राउंडवर खेळणार आहे. चाहत्यांना त्यांच्या बॅटमधून जोरदार कामगिरीची अपेक्षा आहे, ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल.

भारताने या मालिकेच्या अंतिम सामन्यानंतर मुंबईकडे प्रवास करणार आहे. 7 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा सामना पहिल्या दिवशी यूएसएशी वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. मुंबईत संघाचा कॅम्प सुरू होईल, जिथे अंतिम तयारी आणि रणनीतीवर भर दिला जाईल.

न्यूझीलंड: डेव्हाॅन कॉन्वे, टिम सीफर्ट (विकेटकीपर), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), काइल जेमीसन, मॅट हेनरी, ईश सोढी, जेकब डफी, जेम्स नीशम, माइकल ब्रेसवेल, लॉकी फर्ग्यूसन, जैकरी फॉल्क्स, बेवन जैकब्स.

भारत: संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कप्तान), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, हर्षित राणा, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---